Small Business : राज्यात सूक्ष्म, लघु उद्योगांच्या संख्येत वाढ; पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आघाडीवर

राज्यात शहरासह, ग्रामीण भागात रोजगारात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सूक्ष्म, लघु उद्योगांची संख्या वाढते आहे.
Business
Businesssakal

छत्रपती संभाजीनगर - राज्यात शहरासह, ग्रामीण भागात रोजगारात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सूक्ष्म, लघु उद्योगांची संख्या वाढते आहे. २७ जानेवारी २०२३ पर्यंत राज्यात २५ लाख ७८ हजार ६९५ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग होते. त्यात वाढ होऊन चार डिसेंबर २०२३ पर्यंत ही संख्या ३६ लाख ६९ हजार ३४५ झाली आहे.

यामध्ये राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून, येथे पाच लाख ५८ हजार ७९९, ठाणे जिल्ह्यात चार लाख ३ हजार ३५२, मुंबई उपनगरमध्ये दोन लाख ८८ हजार ३८९, मुंबई शहरात दोन लाख ५० हजार ४१९, नाशिकमध्ये एक लाख ८१ हजार ४३, नागपूरमध्ये एक लाख ६२ हजार ७९०, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक लाख ५१ हजार ६७१ तर कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख ५० हजार ८२६ उद्योग आहेत.

राज्यात चार डिसेंबरपर्यंत ३५ लाख ७३ हजार ८९३ सूक्ष्म, ८५ हजार ५६० लघु तर ९ हजार ८९२ मध्यम उद्योग होते. यात सूक्ष्म, लघुउद्योगात मोठी वाढ झाली आहे. २७ जानेवारी २०२३ पर्यंत राज्यात ५२ हजार ७ हजार ५५१ सूक्ष्म, ६४ हजार १० लघु तर ७ हजार १३४ मध्यम स्वरूपाचे उद्योग होते. सद्य:स्थितीत रोजगाराच्या दृष्टीने सूक्ष्म, लघुउद्योग महत्त्वाचे ठरत आहेत. राज्यात सर्वाधिक संख्या सूक्ष्म उद्योगांची आहे. त्यानंतर लघु उद्योगांचा क्रमांक आहे.

देशात १८ ते २९ वयोगटातील तरुणांची संख्या जवळपास ३८ कोटी आहे. या सर्वांना रोजगार देण्याची क्षमता सूक्ष्म, लघु उद्योगांत आहे. पुढे भविष्यातही यात मोठी संधी आहे. त्यामुळे शासनाने लघुउद्योगांना संरक्षण देणे गरजेचे आहे. सध्या देशात २६ टक्केच लघुउद्योग आहेत. त्यामुळे लघुउद्योग वाढीसाठी भरपूर वाव आहे.

- अनिल पाटील, अध्यक्ष, मसिआ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com