esakal | नागाने अख्खा साप गिळलाच होता पण...; पाहा हा थरारक व्हिडिओ!
sakal

बोलून बातमी शोधा

Cobra_Snake

कोब्रा जातीचा नाग दुसऱ्या सापाला शेपटीच्या बाजूने जिवंत गिळत होता. यावेळी बघ्यांची गर्दी वाढली होती. अनेकजण हे दृश्य पाहून घाबरले.

नागाने अख्खा साप गिळलाच होता पण...; पाहा हा थरारक व्हिडिओ!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खडकवासला (पुणे) : कोब्रा जातीच्या नागाने दुसऱ्या लहान सापाला गिळण्याचा प्रकार सिंहगड पायथ्याच्या पायगुडेवाडीत घडला. लोकवस्तीत ही घटना पाहिल्याने अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. लहान साप नागाच्या तावडीतून सुटला. येथील सर्पमित्र आणि गिर्यारोहक असलेल्या लहू उघडे यांनी दोघांना सुखरूप सिंहगड जंगलात नेऊन सोडले.

Breaking : लॉकडाऊनबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी केली मोठी घोषणा; वाचा सविस्तर बातमी!​

सिंहगड पायथ्याला असलेल्या डोणजे गावाच्या पायगुडेवाडी मधील एका फार्महाऊस परिसरात मोठा साप लहान सापाला गिळत असल्याची माहिती मिळाल्याने लहू तेथे पोचले. कोब्रा जातीचा नाग दुसऱ्या सापाला शेपटीच्या बाजूने जिवंत गिळत होता. यावेळी बघ्यांची गर्दी वाढली होती. अनेकजण हे दृश्य पाहून घाबरले. 

पुण्यात नक्की चाललंय तरी काय; उपचाराअभावी तडफडताहेत कोरोना रुग्ण!

लहान साप नागाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत होता. आता आपण पूर्णपणे या सापाच्या पोटात जाणार आहोत, हे समजल्यावर तोंडाशी आल्यावर या लहान सापाने मोठ्या सापाच्या तोंडाला चावा घेतला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने या लहान सापाने जोरात हल्ला सुरू केला. पण मोठ्या सापाच्या तावडीतून त्याची काही सुटका झाली नाही. लहान सापाला गिळल्यानंतर तो पचवू शकला नाही. त्यामुळे तो पुन्हा सापाला बाहेर काढू लागला. लहू याने या दोघांना वेगवेगळ्या पोत्यात बांधून सिंहगडाच्या जंगलात सुखरूप सोडले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा