Maharashtra News : महाराष्ट्रात सर्पदंश निदानासाठी क्रांतिकारक पाऊल; सरकारने मंजूर केले सहा कोटींचे ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट किट’!

Snake Bite Rapid Test : महाराष्ट्र सरकारने सर्पदंशाचे त्वरित निदान करण्यासाठी ६ कोटींच्या स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. यामुळे विषारी आणि बिनविषारी दंश ओळखणे काही मिनिटांत शक्य होऊन रुग्णांचे प्राण वाचण्याची शक्यता वाढणार आहे.
Maharashtra approves rapid snakebite diagnosis with new snake venom test kits worth ₹6 crore for faster rural treatment.

Maharashtra approves rapid snakebite diagnosis with new snake venom test kits worth ₹6 crore for faster rural treatment.

Sakal

Updated on

माळेगाव : शेतकऱ्यांच्या शेती आणि शेती पुरक व्यवसायाला शासनस्तरावर जेवढी अर्थिक मदतीची गरज असते, त्याच तुलनेत त्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेलाही यापुढे महत्व दिले जाणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने संर्पदंशाने जखमी झालेल्या शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यामध्ये सर्पदंश विषारी की बिनविषारी हे तात्काळ समजण्यासाठी सुमारे ६ कोटी रूपये किंमतीचे किट खरेदी करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासनाने घेतला आहे. तशापद्धतीचे परिपत्रक शासनस्तरावर नुकतेच प्रसिद्ध झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com