अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिलीप मालखेडे यांची नियुक्ती

Dr Dilip wankhede
Dr Dilip wankhedesakal media

मुंबई: श्रीमती नाथ‍िबाई दामोदर ठाकरसी (SNDT) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ उज्वल चक्रदेव (Dr ujwala chakradeo) यांची तर पुणे (pune) येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ दिलीप मालखेडे (Dr Dilip Malkhede) यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या (Amravati university) कुलगुरूपदी (vice chancellor) नियुक्ती करण्यात आली आहे.

Dr Dilip wankhede
सावंतवाडीत मुंबई विद्यापीठाचे उप परिसर; राज्यपालांच्या हस्ते उद्या उद्घाटन

दोन दिवसांपूर्वीच या दोन्हीही विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी एसएनडीटी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची नियुक्त्या जाहीर केल्या. या दोन्हीही नियुक्त्या पाच वर्षाच्या कालावधीसाठी असतील. या कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी छत्तिसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती न्या. यतिंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. पुणे येथील आयआयआयटीचे महासंचालक डॉ. अनुपम शुक्ला व राज्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचा कार्यकाळ २ जूलै २०२१ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांचेकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. तर माजी कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ  दिनांक १ जून २०२१ रोजी संपल्यामुळे हे कुलगुरूपद रिक्त होते. डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास भाले यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. 

डॉ उज्वला चक्रदेव यांनी राष्टसंत तुकडोजी महाराज नागपुर विदयापीठाच्या व्हीआरसीई येथुन वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम. टेक. तसेच वास्तुविदयाशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. डॉ उज्वला चक्रदेव यांनी मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी. पर्यवेक्षक म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर ३६ वर्षांचा अनुभव लाभला आहे. तर डॉ मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार  -१ या पदावर प्रतिनियुक्तीवर कार्यरत करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com