esakal | सावंतवाडीत मुंबई विद्यापीठाचे उप परिसर; राज्यपालांच्या हस्ते उद्या उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai University

सावंतवाडीत मुंबई विद्यापीठाचे उप परिसर; राज्यपालांच्या हस्ते उद्या उद्घाटन

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) नव्याने स्थापन होत असलेल्या सिंधुदुर्ग मधील सावंतवाडी (sawantwadi) येथे उप परिसराचे रविवारी, १२ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. सिंधुदुर्ग नगर परिषद (Sindhudurg municipal) यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग उप परिसर या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होत आहे. रविवार दुपारी ३ वाजता आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राज्यपाल (Governor) तथा कुलपती महाराष्ट्र राज्य विद्यापीठे भगतसिंह कोश्यारी (Bhaghat singh koshyari) यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.

हेही वाचा: सामान्य स्त्रीयांसाठीही कणव दाखवा; चाकणच्या ताईंना भाजपचा टोला

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालक मंत्री सिंधुदुर्ग जिल्हा उदय सामंत हे असतील. तर मा. केंद्रीय मंत्री, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय नारायण राणे, मा. खासदार, विनायक राऊत, राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, प्राजक्त तनपुरे,विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव आदी उपस्थित राहणार आहेत.

या शैक्षणिक वर्षापासून येथे कोकणातील विपूल साधन सामुग्रीला उपयुक्त, कौशल्याधारीत आणि व्यावसायाभिमूख प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे करिअर इन्स्टीट्यूट आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने सुरु केले जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण पार्श्वभूमी, तेथील सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या उप परिसरामध्ये दर्जेदार, कौशल्याधारीत आणि व्यावसायाभिमूख शैक्षणिक अभ्यासक्रम त्याचबरोबर उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठाने हे महत्वाचे पाऊल टाकले असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई विद्यापीठाने सिंधुदुर्ग मधील सावंतवाडी येथे उप परिसराची स्थापना करण्याचे ठरविले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची शांत सौंदर्य, समृद्ध नैसर्गिक साधन संपत्ती, १२१ किमीची लांब किनारपट्टी, पुरेसा पाऊस, विविध प्रकारच्या फळांचा अभिमान बाळगणारी हिरवी वनस्पती, खाद्यसंस्कृती, आदारातिथ्य आणि समृद्ध जैवविविधतेने नटलेला जिल्हा म्हणून ओळख आहे.

हेही वाचा: रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लाॅक

त्याचबरोबर कला, नाट्य क्षेत्रासाठीही हा जिल्हा ओळखला जातो. नुकतेच मुंबई विद्यापीठाने संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे कला, नाट्य क्षेत्रातील अभिनयाचा शास्त्रशुद्ध व्यायवसायिक अभ्यासक्रम म्हणून अभिनय कौशल्य पदविका हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे या सर्व गुणधर्मांना उत्पादक परिणामात रुपांतरीत करण्याच्या दृष्टिने या उप परिसराचे महत्व अधोरेखित होणार आहे. ब्ल्यू टूरिझम, एग्रो बेस्ड प्रोसेंसिंग युनिट्स, कॉयर अँड बांबून आधारीत इंडस्ट्रीज, फिशरीज, फलोत्पादन, अपारंपरिक कृषी उत्पादने, फूड टेक्नॉलॉजी, फ्रूट प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, वाईनरी टेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रात विपूल संधी निर्माण होऊ शकतात.

या अशा संशोधन आणि उद्योन्मुख क्षेत्रातील पदवीधरांचा व्यवसाय सुनिनिश्चित करण्याबरोबरच रोजगार आणि उद्योजकता निर्माण करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. त्याचबरोबर आजीवन शिक्षण आणि इतर विस्तार उपक्रमांसह विद्यापीठ आंतरविद्याशाखीय उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणार केले जाणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

loading image
go to top