Eknath Shinde : ".. तर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद सुद्धा जाईल", वाचा काय म्हणतात घटनातज्ञ

राज्यातील सत्तासंघर्षात वरचढ कोण? आज महत्वपूर्ण सुनावणी
Eknath Shinde
Eknath ShindeEsakal

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि ४० आमदारांना सोबत घेत भाजपाशी युती केली. राज्यात शिंदे भाजप सरकार देखील स्थापन झालं.यानंतर मागच्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची यावरून वाद सुरू आहे. यादरम्यान आता शिवसेनेत पडलेल्या या फूटीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

याबाबत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आज दोन महत्त्वाच्या सुनावण्या पार पडणार आहेत. एक निवडणूक आयोगासमोर आणि सुप्रीम कोर्टामध्ये पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे. यावर कोर्टाने स्पष्टीकरण द्यायला हवे. आज काय होईल तर तारीख पुढे जाईल आणि ७ न्यायमूर्ती यांच्याकडे हा खटला जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतून दोन तृतीयांश एकाच वेळी बाहेर पडले या गोष्टीला मी सहमत आहे. शिवसेनेतून जे16 लोकं बाहेर पडले ते दोन तृतीयांश होत नाहीत हे अपात्र झाले तर एकनाथ शिंदे यांना मंत्री राहता येणार नाही. त्या 16 मध्ये एकनाथ शिंदे देखील आहेत त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद सुद्धा जाईल असं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हंटलं आहे.

Eknath Shinde
Thackeray Vs Shinde : राज्यातील सत्तासंघर्षात वरचढ कोण? आज महत्वपूर्ण सुनावणी

हे 16 जण अपात्र ठरले तर सरकार कोसळेल आणि मग राष्ट्रपती राजवट लागेल आणि ६ महिन्यांनी निवडणूक लागेल आता सुप्रीम कोर्ट बघू काय निर्णय देते असंही पुढे घटनातज्ञ उल्हास बापट म्हणाले आहेत.

त्याचबरोबर १३,१४ राज्याचे राज्यपाल बदलले गेले याचा अर्थ म्हणजे २०२४ ची निवडणूक येत आहे हे दाखवून देण्यासाठी बदल केले गेले असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. राज्यपाल, सुप्रीम कोर्ट, स्पीकर यांचे म्हणणे कमी कमी होत चालले आहे हे लोकशाहीला बाधक आहे. कोणी ही राज्यपाल आला तरी त्यांची नियुक्ती राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडून केली जाते. राज्यपाल यांच्या विरोधात खटले भरू जाऊ शकत नाही असंही बापट यावेळी म्हणाले आहेत.

Eknath Shinde
Devendra Fadnavis: "फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य, दोन दिल्लीत बसलेत अन्…"

मला राजकीय पक्षात कवडी एवढा रस नाही. लवकरात लवकर निर्णय सुप्रीम कोर्टाने द्यायला हवा आपण निकाल लवकर येऊ अशी आशा करू. पुनर्विचार याचिका एखाद्या वेळी बदलली जाते. आता निर्णय जो येईल तो अंतिम येईल. राजकीय लोकांनी नीतिमत्तेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

Eknath Shinde
Sharad Pawar : "पवारांनी चुकीची आकडेवारी जाहीर करून दुष्काळी भागाचे पाणी बारामतीला पळवले"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com