esakal | स्वयंसेवी संस्थांसाठी " सोशल फॉर अॅक्शन "
sakal

बोलून बातमी शोधा

Social for Action initiative and crowd funding by Sakal media group

 

क्राउड फंडींगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ; सकाळ माध्यम समूहाचा उपक्रम.

स्वयंसेवी संस्थांसाठी " सोशल फॉर अॅक्शन "

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : " सकाळ " हे केवळ वृत्तपत्र नसून वेळोवेळी सामाजिक बांधिलकी स्वीकारणारी संस्था आहे. दैनिक "सकाळ" ने १९३२ पासून अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले आहे. " सकाळ माध्यम समूहाला " ८९ वर्षांची सामाजिक परंपरा आहे. "सकाळ" च्या प्रमुख " सकाळ सोशल फाउंडेशन ", " सकाळ रिलीफ फंड " व " सकाळ इंडिया फाउंडेशन" या स्वयंसेवी संस्थांद्वारे शिक्षण ,आरोग्य, पर्यावरण , नागरी प्रश्न , आपत्ती व्यवस्थापन , हेरिटेज संवर्धन , विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत व सांस्कृतिक - कला या विविध क्षेत्रात अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

प्रत्येक सामाजिक उपक्रमासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असते. महाराष्ट्रात ग्रामीण भागात व शहरी भागात अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था विविध समाजविधायक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करीत असतात. तसेच समाजातील अनेक होतकरू तरुण नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानात्मक संशोधनासाठी प्रयत्न करत असतात. या सर्व होतकरू आणि नावीन्यपूर्ण संशोधनासाठी प्रयत्न करत असलेल्या युवकांना आणि संशोधकांना तसेच वैद्यकीय कारणासाठी व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असलेले रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक यांना व्यक्तिगत स्तरावर आर्थिक मदतीची नितांत गरज असते.

एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या सामाजिक उपक्रमासाठी व्यक्तिगत स्वरूपात किंवा एखाद्या कंपनीच्या सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व विभागांतर्गत) निधी मिळत असतो. पण प्रत्येक सामाजिक उपक्रमात जनजागृतीद्वारे सामूहिक लोकसहभाग वाढवला तर अशा सामाजिक उपक्रमांचा विस्तार होऊन होणारे परिणाम व फायदे समाजासाठी दीर्घकालीन व शाश्वत स्वरूपाचे असतात. हा हेतू लक्षात घेऊन "सकाळ " ने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांसाठी व नाविन्यपूर्ण तांत्रिक दृष्ट्या शोधात्मक संशोधन करणाऱ्या तरुणांना तसेच वैद्यकीय कारणासाठी व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी क्राउड फंडिंग मिळवून देण्यासाठी "सोशल फॉर अॅक्शन" हा क्राउड फंडिंगसाठी वेबसाईट स्वरूपात डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक मदतीसाठी क्राउड फंडिंगचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

यासाठी " सकाळ " कडून प्राथमिक टप्प्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या तेरा क्रियाशील स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांची माहिती "सोशल फॉर अॅक्शन " या क्राउड फंडिंग च्या प्लॅटफॉर्म वर अपलोड करण्यात आली आहे.

सीएसआर कंपन्या व देणगीदारांनी असे व्हावे सहभागी :-

"सोशल फॉर अॅक्शन " या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांसाठी समाजातील दानशूर व्यक्ती , माहिती -तंत्रज्ञान कंपन्या , सीएसआर कंपन्या व परदेशी - भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन विविध स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांसाठी वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

महाविद्यालयीन युवक - युवतींना तसेच तरुणांना " सामाजिक उपक्रमांसाठी " स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी :

ज्यांना समाजसेवेची आवड आहे , तसेच सामाजिक कामाचा अनुभव घ्यायचा आहे. असे महाविद्यालयीन युवक - युवती व तरुण त्यांच्या वेळेनुसार व विविध सामाजिक उपक्रमांसाठी https://socialforaction.com/ या वेबसाईट वर जाऊन व्हॉलेंटिअर या बटन वर क्लिक करून आपली माहिती भरून स्वयंसेवक म्हणून नोंदणी करू शकतात.

स्वयंसेवी संस्थांनी असे व्हावे सहभागी :

महाराष्ट्रात विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आपल्या सामाजिक उपक्रमाची माहिती https://socialforaction.com/ या वेबसाईट वर जाऊन एनजीओ फंडरेझिंग या सेक्शन मध्ये जाऊन स्वयंसेवी संस्थांसाठी असणारा फॉर्म भरून आपल्या संस्थेसाठी ऑनलाईन क्राउड फंडींगसाठी फंडरेझिंग अभियान सुरु करू शकता. स्वयंसेवी संस्थेसाठी नोंदणी प्रमाणपत्र , ८० जी प्रमाणपत्र व १२ ए प्रमाणपत्र आवश्यक आहे.

तसेच नाविन्यपूर्ण तांत्रिक दृष्ट्या शोधात्मक संशोधन करणारे व आर्थिक मदतीची आवश्यकता असलेले तरुण तसेच वैद्यकीय कारणासाठी व(शस्त्रक्रियेसाठी) आर्थिक मदतीची आवश्यकता असलेले रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक https://socialforaction.com/ या वेबसाईट वर जाऊन इंडिव्हिज्युअल फंडरेझिंग या सेक्शन मध्ये जाऊन आपल्या व्यक्तिगत माहितीचा फॉर्म भरून आपल्या प्रकल्पाची व वैद्यकीय माहिती पाठवू शकता. यासाठी प्रमाणित तंत्रनिकेतन संस्था, शैक्षणिक संस्था व तत्सम संस्थेचे संशोधनासाठीचे व वैद्यकीय मदतीसाठी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व रुग्णालयाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :- ८६०५०१७३६६

loading image