नागपूर - ‘काम करणाऱ्या लोकांना शोधून काढून त्यांचा सन्मान केला पहिजे. परंतु, आपल्याबाबत आजही काही लोक दिशाभूल आणि संभ्रम पसरविण्याचे काम करीत असतात. पक्ष वाढीसाठी आपल्याला लोकांशी जुळल्याशिवाय पक्ष वाढेल कसा,’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी चिंतन शिबिरामध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांपुढे उपस्थित केला.