माणगाव (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गाची साडेसाती आता कळमजे ग्रामस्थांच्या मुळावर आली आहे. माणगावजवळील कळमजे येथील पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. तेथील गोद नदीपात्रात मातीच्या भरावामुळे परिसरातील पाच गावांतील नागरिकांना मातीमिश्रित गढूळ आणि दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे येथील शेकडो ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.