

Historical Significance of the Solapur Stone Labyrinth
sakal
अरविंद मोटे
Historical Significance of the Solapur Stone Labyrinth: बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे दगडी चक्रव्यूह हे कलावंतीणी कोडे नसून तेर-रोम व्यापारी मार्गाच्या पाऊलखुणा आहेत. १५ रिंगण असलेले दगडी चक्रव्यूह कड्याच्या संख्येनुसार देशातील सर्वांत मोठा तर क्षेत्राफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे दगडी चक्रव्यूह आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्व अभ्यासक सचिन पाटील यांनी येथे नुकतीच भेट दिल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे.