सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. अमित आळंगे यांची बाजी! वकील मतदारांकडून क्रॉस वोटिंगमध्ये ‘हे’ उमेदवार विजयी

सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. अमित आळंगे यांनी बाजी मारली असून त्यांच्या विधी सेवा पॅनेलचे ॲड. विनयकुमार कटारे यांनी खजिनदार म्हणून तर सहसचिव म्हणून ॲड. निदा सैफन हे विजयी झाले.
ad. amit aalange
ad. amit aalangesolapur

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. अमित आळंगे यांनी बाजी मारली असून त्यांच्या विधी सेवा पॅनेलचे ॲड. विनयकुमार कटारे यांनी खजिनदार म्हणून तर सहसचिव म्हणून ॲड. निदा सैफन हे विजयी झाले. तर दुसरीकडे विधी व्यासपीठ पॅनेलचे प्रमुख अध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. एस. व्ही. उजळंबे यांना पराभवाचा सामना करावा लागला, मात्र त्यांच्या पॅनेलचे ॲड. व्ही. पी. शिंदे हे उपाध्यक्ष म्हणून तर ॲड. मनोज पामूल हे सचिव म्हणून विजयी झाले.

बार असोसिएशनच्या सहसचिव पदासाठी ॲड. उजळंबे यांच्या पॅनेलमधील ॲड. मीरा प्रसाद तर ॲड. आळंगे यांच्या विधी सेवा पॅनेलमधील ॲड. निदा सैफन यांच्यात पहिल्या फेरीपासून रस्सीखेच सुरू होती. पहिल्या फेरीत मीरा प्रसाद यांना ४४ तर निदा सैफन यांना ४२ मते होती. १५व्या फेरीअखेर मीरा प्रसाद यांना ६०९ तर निदा सैफन यांना ६२८ मते मिळाली होती. दोघींच्या मतांमध्ये अगदी काही मतांची आघाडी होती. दुसरीकडे या निवडणुकीत ॲड. राजेंद्र फताटे यांच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला. त्यांच्या पॅनेलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. दरम्यान, मावळते अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. सुरेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या टिमने अतिशय अत्कृष्टपणे निवडणुकीचे कामकाज हाताळले.

ॲड. आळंगेंना पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत आघाडी

पहिल्या फेरीतील १०० मतदानात ॲड. अमित आळंगे यांना ५५ तर ॲड. एस. व्ही. उजळंबे यांना ३३ मते मिळाली. दहाव्या फेरीत आळंगे यांना उजळंबे यांच्या तुलनेत १५९ मते जास्त मिळाली होती. पंधराव्या फेरीअखेर १५०० मतांची मोजणी पूर्ण झाल्यावर ॲड. आळंगे यांना ७९५ तर ॲड. उजळंबे यांना ५४८ मते मिळाली होती. पहिल्या फेरीपासूनच ॲड. आळंगे यांनी पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत आपली आघाडी कमी होऊ दिली नाही.

बार असोसिएशनचे नूतन पदाधिकारी

 • १) विधी सेवा पॅनलचे विजयी उमेदवार

 • अध्यक्ष : ॲड. अमित आळंगे (८५१)

 • सहसचिव : ॲड. निदा सैफन (६७७)

 • खजिनदार : ॲड. विनयकुमार कटारे (६४३)

 • ----------

 • २) विधी व्यासपीठ पॅनलचे विजयी उमेदवार

 • उपाध्यक्ष : ॲड. व्ही. पी. शिंदे (६७१)

 • सचिव : ॲड. मनोज पामूल (७५४)

ठळक बाबी...

 • - ॲड. राजेंद्र फताटे यांच्या पॅनलचा दारूण पराभव, फताटे यांना मिळाली १५२ मते

 • - अध्यक्षपदासाठी ॲड. अमित आळंगे यांना ८५१ तर ॲड. उजळंबे यांना ५८१ मते

 • - सहसचिव पदासाठी ॲड. मीरा प्रसाद व ॲड. निदा सैफन यांच्यात पहायला मिळाली चूरस, २७ मतांनी ॲड. सैफन यांचा विजय

 • - ॲड. आळंगे यांच्या पॅनलचे तीन (अध्यक्ष, खजिनदार, सहसचिव) तर ॲड. उजळंबे यांच्या पॅनलचे दोन (उपाध्यक्ष व सचिव) उमेदवार विजयी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com