सोलापूर शहर डीजेमुक्तच! गणेशोत्सवानंतर शक्तीदेवींच्याही मिरवणुकांमध्येही वाजला नाही ‘डीजे’; ढोल-लेझीम पहायला गर्दी, बंदोबस्तातील पोलिस ‘रिलॅक्स’

यंदा सोलापूर शहरात गणेशोत्सव डीजेमुक्त पार पडला. त्यानंतर गुरुवारी शक्तीदेवीच्या मिरवणुका देखील १०३ मंडळांनी डीजेमुक्तच काढल्याचे दिसून आले. यावेळी लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुका पाहायला घराबाहेर आलेल्या भाविकांची संख्याही मोठी होती.
solapur city navratra mohtsav

solapur city navratra mohtsav

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : यंदा सोलापूर शहरात गणेशोत्सव डीजेमुक्त पार पडला. त्यानंतर गुरुवारी (ता. २) शक्तीदेवीच्या मिरवणुका देखील १०३ मंडळांनी डीजेमुक्तच काढल्याचे दिसून आले. यावेळी लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुका पाहायला घराबाहेर आलेल्या भाविकांची संख्याही मोठी होती.

नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सोलापुरात ३१ वरिष्ठ पोलिस अधिकारी, ६७ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक आणि १०२५ पोलिस अंमलदार, ६७७ होमगार्ड आणि एक राज्य राखीव पोलिस बलाची तुकडी बंदोबस्तासाठी होती. दरवर्षी डीजेच्या आवाजात काढल्या जाणाऱ्या मिरवणुकांमुळे बंदोबस्तावरील पोलिसांच्या कानात बोळे दिसायचे. त्यांच्यावरील कामाचा ताण त्या मिरवणुकांमध्ये जास्त असायचा. पण, यंदा दुर्गादेवीच्या मिरवणुकांमध्ये पोलिस ‘रिलॅक्स’ दिसले.

तेही या उत्सवात आनंदाने सहभागी झाले होते. शक्तीदेवीच्या मिरवणुकांमध्ये ९० पेक्षा जास्त मंडळांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी लेझीमचे बहारदार खेळ सादर केले. उर्वरित मंडळांनी ढोल-ताशांचा बहारदार खेळ सादर करून भाविकांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वाद्यांच्या गजरातील मिरवणुका पाहायला आलेल्या सोलापूरकरांची संख्या दीडपटीने जास्त दिसून आली.

सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन

गणेशोत्सवानंतर यंदा दुर्गादेवीच्याही मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आल्या. सोलापूर शहरातील सर्व नवरात्रोत्सव मध्यवर्ती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही डीजेमुक्त मिरवणुकांसाठी पुढाकार घेतला. पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे सर्वांनी पालन करीत सर्व मंडळांनी शांततेत, आनंदात मिरवणुका काढल्या. त्यामुळे मिरवणुका पाहायला आलेल्या भाविकांची गर्दी मोठी दिसून आली.

- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

१०३ मंडळांकडून मिरवणुका

सोलापूर शहरातील नऊ नवरात्रोत्सव मध्यवर्ती मंडळांसह त्याअंतर्गत २३ मंडळांनी शक्तीदेवीच्या मिरवणुका काढल्या. याशिवाय शहरातील विविध भागातील ८० मंडळांनी देखील त्यांच्या त्यांच्या भागात डीजेमुक्त मिरवणुका काढल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

 Inspector of Police
traffic police (file photo)
solapur city police
solapur cp office
Marathi News Esakal
www.esakal.com