सोलापूर पोलिसांचा निर्णय! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व श्री बसवेश्वर जयंती मिरवणुकांत डॉल्बी-डीजे वापरण्यावर बंदी, आदेश काय आहे? वाचा...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात निघणाऱ्या मिरवणुकांत डीजे साऊंड सिस्टिमच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
Photo

solapur city cp m raj kumar

sakal

Updated on

तात्या लांडगे

१४ एप्रिलपासून शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे. रविवारी (ता. १९) मिरवणुका काढण्यात येणार आहेत. २० एप्रिल रोजी बसवजयंती असून त्यानिमित्त देखील मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर डीजे सिस्टिमचा मोठ्या आवाजात वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने १७ एप्रिल ते २१ एप्रिल रोजी रात्री बारापर्यंत या कालावधीत आयोजित मिरवणुका, सार्वजनिक कार्यक्रमात आणि कोणत्याही व्यक्ती अथवा आयोजकांच्या कार्यक्रमात डॉल्बी- डीजे सिस्टिमचा वापर करण्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन कानाचे विकार, छातीचा त्रास आणि इतरही शारीरिक समस्या उद्भवू शकतात, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वीही सोलापूर शहरात निघालेल्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टिममुळे त्रास व अपघाताच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

(आदेशाचे उल्लंघन केल्यास "ही" कारवाई)
सार्वजनिक आरोग्य व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ही बंदी आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशानुसार, कोणत्याही मिरवणुकीत किंवा सार्वजनिक कार्यक्रमात डिजे (साऊंड) सिस्टिमचा वापर करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या १६३ (१) कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

----------------------------

(लेझर व बीम लाईटवरही बंदी)

- मिरवणुकांमध्ये लेझर लाईट व प्रखर बीम लाईट वापरास मनाई

- तीव्र प्रकाशामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होण्याचा धोका

- अपघाताची शक्यता वाढते

- सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने बंदीचा निर्णय

- आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com