
सोलापूरमधील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दोन राज्यातील प्रसिद्ध उद्योजकाचा कुटुंबासह होरपळून मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत हाजी उस्मान मंसुरी, अनस मंसुरी, शिफा मंसुरी, युसूफ मंसुरी या मंसुरी कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. हाजी उस्मान मंसुरी प्रसिद्ध उद्योजक होते. त्यांचा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये टॉवेल निर्मिताचा हा व्यवसाय विस्तारला होता.