सोलापूर बनले सर्वाधिक रिक्षांचे शहर! परमिट बंद न झाल्याने 10 वर्षांत वाढल्या 15000 रिक्षांची वाढ; प्रवासी दिसेल तेथेच थांबा; प्रवासाचा वेळ 5 ते 7 मिनिटांनी वाढला

चादरीसाठी प्रसिद्ध असलेले शहर आता रिक्षांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. महापालिकेचा परिवहन उपक्रम बंद पडण्याच्या मार्गावर आहे, तो वाढलेल्या रिक्षांमुळेच. शहरात दरमहा सरासरी ११५-१२० रिक्षा वाढतात. शहरातील परवानाधारक रिक्षांची संख्या १९ हजारांवर पोचली असून विनापरवाना रिक्षाही तेवढ्याच असू शकतात.
सोलापूर रिक्षा
सोलापूर रिक्षाsolapur sakal
Updated on

सोलापूर : चादरीसाठी प्रसिद्ध असलेले शहर आता रिक्षांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. महापालिकेचा परिवहन उपक्रम बंद पडण्याच्या मार्गावर आहे, तो वाढलेल्या रिक्षांमुळेच. शहरात दरमहा सरासरी ११५-१२० रिक्षा वाढतात. शहरातील परवानाधारक रिक्षांची संख्या १९ हजारांवर पोचली असून विनापरवाना रिक्षाही तेवढ्याच असू शकतात.

सोलापूर महापालिकेच्या ताफ्यात २०१५-१६ मध्ये तब्बल ११० बस होत्या आणि सुमारे दोन लाख प्रवासी दररोज बसमधून प्रवास करायचे. त्याच परिवहन उपक्रमाकडे सध्या २० बस, त्याही १२ वर्षांपूर्वीच्या आहेत. वेळेत चालक-वाहक मिळत नाहीत, अशी दुरवस्था झाली आहे. २०१५-१६ मध्ये चार-साडेचार हजार रिक्षा असलेल्या सोलापूर शहरात दहा वर्षांत १५ हजार रिक्षा वाढल्या आणि दुसरीकडे परिवहन उपक्रम बंद पडण्याच्या मार्गावर आहे. काही शासकीय अधिकारी ‘चिरीमिरी’ घेऊन नियमबाह्य रिक्षांकडे कानाडोळा करतात आणि त्यामुळेच सध्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड व पुणे या शहरातून मोठ्या प्रमाणावर रिक्षा सोलापुरात येत आहेत. सोलापूरच्या ग्रामीण भागातीलही अनेक रिक्षा शहरात धावतात. वास्तविक, पेट्रोल-डिझेलवरील रिक्षांचे आयुर्मान १५ वर्षे आहे, पण मुदत संपण्यापूर्वी कोणी रिक्षा ‘एलपीजी’वर केल्यास त्यांना पाच वर्षे (एकूण २० वर्षांपर्यंत) मुदतवाढ मिळते.

‘सीएनजी’वर केलेल्या रिक्षाचे आयुर्मान २५ वर्षांपर्यंत आहे. सध्या याच नियमाचा आधार घेऊन स्क्रॅप करण्यालायक शेकडो रिक्षा सोलापुरातील रस्त्यांवर धावताना आढळतात. पण, त्यावर अलिकडे कधी कारवाई झालेली दिसली नाही. दुसरीकडे एखाद्या शहरात किती रिक्षा असाव्यात, यावर सध्यातरी कोणाचेच नियंत्रण नसल्याने सोलापूर शहरात जागोजागी रिक्षाच दिसतात आणि त्यात दरमहा भर पडत आहे.

रिक्षांना परमिट देणे बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव यापूर्वीच पाठविला

सोलापूर शहरातील वाढत्या रिक्षांना परमिट देणे बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव सोलापूर जिल्हा प्राधिकरणाने जुलै २०२२ मध्येच परिवहन विभागाला सादर केला आहे. त्यावर राज्य स्तरावरून निर्णय अपेक्षित आहे. सोलापुरात रिक्षांची संख्या खूपच असून त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे.

- गजानन नेरपगार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

वर्षनिहाय रिक्षांची वाढ

  • सन एकूण रिक्षा

  • २०२१ १४,८२३

  • २०२२ १५,०७९

  • २०२३ १६,४४१

  • २०२४ १७,४१२

  • फेब्रुवारी २०२५पर्यंत १९,५९७

प्रवासाचा वेळ ५ ते ७ मिनिटांनी वाढला

सोलापूर-पुणे महामार्गावरील शिवाजी नगर (बाळेजवळ), तुळजापूर रोडला तळेहिप्परगा, विजयपूर रोडवर सोरेगाव, हैदराबाद रोडवर मुळेगाव क्रॉस रोड, होटगी रोडला विमानतळ येथूनच सोलापूर शहरात किती रिक्षा असतील, याचा अंदाज येतो. अनेकांना त्यांच्या गावापासून शहरापर्यंत यायला अवघे काही मिनिटे, तास लागतात. पण, सोलापूर शहरात प्रवेश केल्यावर इच्छितस्थळी पोचायला त्यांना किमान पाच-सात मिनिटे तरी जास्तच लागतात, त्यामागील प्रमुख कारण म्हणजे अनिर्बंध वाढलेल्या रिक्षा आहेत.

‘प्रवासी दिसेल तेथेच रिक्षा थांबा’

वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून शहर पोलिस, आरटीओ व महापालिका या यंत्रणांनी रिक्षांसाठी विशिष्ट ठिकाणी थांबे दिले. पण, रिक्षांची संख्या भरमसाठ झाल्याने त्यांच्यातील भाड्याच्या स्पर्धेतून रिक्षाचालक प्रवासी दिसेल तेथेच अचानक थांबतोय. त्यामुळे किरकोळ अपघाताची संख्याही खूप वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com