

तात्या लांडगे
सोलापूर : गळ्यातील ‘पीएसआय’चे बनावट ओळखपत्र दाखविले. त्यानंतर सैफूल येथील दुकानदारास ५० हजाराची खंडणी मागितली. यापूर्वी अक्कलकोट व बाळे येथील पानटपरी चालकांनाही असाच त्याने गंडा घातला आहे. त्या राहुल कल्लप्पा वग्गे (रा. लिंबी चिंचोळी, ता. दक्षिण सोलापूर) या संशयितास विजापूर नाका पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
सोलापूर शहरातील ओम गर्जना चौकातील महादेव संगप्पा याळगी यांचे सैफूल येथे अश्वित ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. गुरुवारी (ता. ३०) सकाळी अकराच्या सुमारास राहुल वग्गे हा त्याठिकाणी आला. ‘तुम्ही सिगारेट व पान मसाला का विकता, तो सगळा साठा जप्त करायचा आहे. तुम्हाला अटक करावी लागेल’ अशी भीती दाखविली. त्यावेळी वग्गे याने गळ्यातील ‘पीएसआय’चे आयकार्ड दाखविले. अधिकारी एकटाच कसा काय कारवाईसाठी आला, याबद्दल फिर्यादी महादेव याळगी यांना संशय आला. त्यांनी ‘डायल ११२’वर कॉल केला. विजापूर नाका पोलिस घटनास्थळी पोचले. त्यावेळी आपण पोलिस उपनिरीक्षक असून मुख्यालयात असल्याचे त्याठिकाणी आलेल्या अंमलदार सांगितले.
पण, त्यांनाही संशय आला आणि चौकशीसाठी त्या तोतया पोलिस उपनिरीक्षकास पोलिस ठाण्यात नेले. त्यावेळी त्याचा भांडाफोड झाला. त्याने यापूर्वी अक्कलकोट व बाळे येथील पानशॉप चालकांना असाच गंडा घातल्याचे तपासात समोर आले. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्याने विजापूर नाका पोलिसांनी राहुल वग्गे याने ज्या पानशॉपवाल्यांना लुबाडले त्यांच्याकडे चौकशीसाठी नेले होते. सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड तपास करीत आहेत.
कोल्हापूर जेलमध्ये भेटला मित्र; गावातच बनवून घेतले ओळखपत्र
सांगलीतून सोन्याचे दागिने चोरून आणल्याच्या गुन्ह्यात राहुल वग्गे हा काही महिने कोल्हापूरच्या तुरुंगात होता. त्याठिकाणी त्याला एकजण भेटला होता. त्याने ‘पीएसआय’ बनून असे पैसे कमावता येतात ही आयडिया दिली होती. जेलमधून गावी आल्यावर राहुलने गावातूनच बनावट ओळखपत्र तयार करून घेतल्याची बाब समोर आली आहे. पोलिस त्या अनुषंगाने देखील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.