star air Solapur-Mumbai
सोलापूर : राज्य सरकारच्या तंबीनंतर स्टार एअर कंपनीने सोलापूर ते मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. २८ जून रोजी बंद केलेली सेवा ३५ दिवसांनंतर, २ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. २ ऑगस्ट रोजी सोलापूर ते मुंबई जाण्यासाठी ४५ जणांनी बुकिंग केले आहे. तर मुंबईहून सोलापूरला येण्यासाठी प्रतिसाद कमी आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाली असली, तरी अद्याप गोवा ते सोलापूर विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. फ्लाय ९१ कंपनीने ३० ऑगस्टनंतर सेवा सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्टार एअर व फ्लाय ९१ या दोन्ही कंपन्यांनी दृश्यमानता आणि नाईट लॅंडिंगचे कारण देत विमानसेवा बंद केली होती. दिवसा सेवा देणाऱ्या कंपनीने दृश्यमानता व नाईट लॅंडिंगचे कारण पुढे केल्याची बाब पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शासनाकडून कंपनीवर थेट कारवाईचा बडगा उचलण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंर सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. पहिल्या उड्डाणासाठी सोलापूरहून मुंबईला जाण्यासाठी ४५ जणांनी बुकिंग केले आहे. तर मुंबईहून सोलापूरला येण्यासाठी २० जणांचे बुकिंग झाले आहे. यामध्ये २ ऑगस्टपर्यंत वाढ होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पालकमंत्र्यांचे प्रयत्न अन् मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी पावसाळा असल्याने अधिक नफा देणाऱ्या मार्गांवर विमानसेवा देण्याची तयारी केली होती. त्यामुळे कमी नफा व कमी प्रतिसाद असलेले मार्ग बंद केले होते. त्यात सोलापूरचाही समावेश होता. सोलापूर ते मुंबई विमानसेवा देण्यासाठी कंपनीला शासनाकडून अनुदान देण्यात आले होते. तरीही कंपनीने सेवा बंद केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोटीस देत कारवाई करण्याचे आदेश देताच कंपनीने विमानसेवा देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार २ ऑगस्टपासून विमानसेवाही सुरू केली.
आठवड्यातील चार दिवस सेवा
सोमवार व बुधवार - आगमन ५.१० वाजता, प्रस्थान ५.४० वाजता
शुक्रवार व रविवार - आगमन १.३० वाजता, प्रस्थान २.०० वाजता
तिकीट दर - ३ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.