

BJP leaders celebrate victory after securing a majority in Solapur Municipal Corporation as Ward 2 delivers decisive results amid political controversy.
esakal
Solapur Municipal Election Results : राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर महापालिकेचे निकाल हाती आले असून भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूर महापालिकेतील प्रभाग २ कडे राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण, मनसेचे (MNS) युवा नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झालेल्या या प्रभागात काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. येथील प्रभागात भाजपकडून शालन शिंदे उमेदवार होत्या, येथील प्रभागात भाजप (BJP) आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख हेही मैदानात होते. प्रभाग २ मधील भाजपचे सर्वच उमेदवार विजयी झाले असून किरण देशमुख यांनी तब्बल ११ हजार मतांनी विजय मिळवल्याची माहिती आहे.