

Solapur Railway Mega Block on Sunday
sakal
Solapur Railway Mega Block: दमाणीनगर येथील रेल्वे पुलाच्या पाडकामाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१४) मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. नऊ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तर नऊ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. सिद्धेश्वर, वंदे भारत, हुतात्मा एक्स्प्रेस मात्र सुरळीत धावणार आहेत. मात्र सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (इंद्रायणी) कुर्डुवाडीहूनच परत फिरणार आहे.