esakal | ब्रेकिंग न्यूज! सोलापूर 'या' दिवसापासून पुन्हा लॉक; पुढील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक 
sakal

बोलून बातमी शोधा

2lockdown_20solapur.jpg

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. दुसरीकडे मृत्यूदरही लक्षणीय राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाउनची मागणी होत असल्याने त्याबाबत पुढील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीतील निर्णयानुसार जिल्ह्यात काही दिवसांचा कडक लॉकडाउन केला जाणार आहे. तत्पूर्वी, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना सूचना देऊन वस्तू खरेदीसाठी काही दिवसांचा वेळ दिला जाणार आहे. 

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर 'या' दिवसापासून पुन्हा लॉक; पुढील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. दुसरीकडे मृत्यूदरही लक्षणीय राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाउनची मागणी होत असल्याने त्याबाबत पुढील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीतील निर्णयानुसार जिल्ह्यात कडक लॉकडाउन केला जाणार आहे. तत्पूर्वी, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना सूचना देऊन वस्तू खरेदीसाठी काही दिवसांचा वेळ दिला जाणार आहे. 

शहरातील झोपडपट्टी एरिया असो की कामगार वस्तीतून आता कोरोनाचा संसर्ग अर्पाटमेंटमध्ये वाढू लागला आहे. शहरातील सर्वच परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातून शहरात येणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांचीही वाढ झाली आहे. शहर पोलिसांनी आठ ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारले असून त्याठिकाणी दररोज सरासरी 300 हून अधिक वाहनांवर कारवाई केली जात आहे. तर शहरातही दररोज 350 हून अधिक बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी वेळ निश्‍चित करुनही विक्रेते व ग्राहक नियमांचे पालन न करता वेळेचेही उल्लंघन करु लागले आहेत. दरम्यान, आता पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा होम क्‍वारंटाईनचा कालावधी उद्या (सोमवारी) संपणार आहे. त्यामुळे आता शहर-जिल्ह्यातील आमदारांशी चर्चा करुन पुढील आठवड्यात हे अधिकारी कडक लॉकडाउनचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना कळविणार आहेत. 

लोकप्रतिनिधी अन्‌ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर कडक लॉकडाउन 
रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींसाठी संस्थात्मक विलगीकरण कक्षात वाढ करणे, पॉझिटिव्ह रुग्णांवरील उपचाराची सोय, अशा सर्व बाबींची व्यवस्था केली जाणार आहे. त्यानंतर काही दिवसांचा कडक लॉकडाउन केला जाणार आहे. परंतु किती दिवसांचा कडक लॉकडाउन करायचा, याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त, पोलिस आयुक्‍त, पोलिस अधिक्षक निर्णय घेतील. तत्पूर्वी, स्थानिक लोकप्रतिनिधींचीही मते जाणून घेतली जातील आणि त्यानुसार कडक लॉकडाउनची कार्यवाही केली जाईल. 
- दत्तात्रय भरणे, पालकमंत्री

कडक लॉकडाउनची प्रमुख कारणे... 

  • शहरातील झोपडपट्टी, कामगार वस्तीसह आता अर्पाटमेंटमध्येही वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण 
  • शहर-जिल्ह्यात अनलॉकनंतर रुग्णसंख्येत मोठी वाढ; मृत्यूदरही आटोक्‍यात येईना 
  • पोलिस आयुक्‍तांनी बेशिस्त वाहतुकीबाबत आदेश काढूनही एका महिन्यात 20 हजारांहून अधिक वाहनचालकांकडून आदेशाचे उल्लंघन 
  • अनलॉकनंतर कोरोनापासून दूर असलेल्या तालुक्‍यातही सापडले कोरोनाचे रुग्ण; जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग 
  • शहरातील वाहनचालकांसह जिल्ह्यातील वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन; प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना राहिले नाही गांभीर्य