सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! अकलूजमधील गुन्हेगारांच्या टोळीतील ‘या’ १३ जणांवर ‘मोक्का’चे कलम; तडीपार करूनही वर्तनात सुधारणा नाही

अकलूज येथील १३ सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तसा प्रस्ताव सादर केला होता. सध्या टोळीतील सगळे तुरूंगातच आहेत, पण आता त्यांच्याविरुद्ध ‘मोक्का’चे कलम लागल्याने त्यांना आता तुरुंगातच राहावे लागणार आहे.
solapur rural police

solapur rural police

sakal
Updated on

सोलापूर : अकलूज येथील १३ सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तसा प्रस्ताव सादर केला होता. सध्या टोळीतील सगळे तुरूंगातच आहेत, पण आता त्यांच्याविरुद्ध ‘मोक्का’चे कलम लागल्याने त्यांना आता तुरुंगातच राहावे लागणार आहे.

अकलूजमधील लक्ष्मण बंदपट्टे, ज्ञानेश्वर काळे या सराईत गुन्हेगारांविरुद्ध गंभीर गुन्हे असून त्यांच्या टोळीत आणखी ११ जण आहेत. त्या सर्वांनी मिळफन मागील दहा वर्षात संघटितपणे गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरोधात घातकशस्त्राने खूनाचा प्रयत्न, इच्छापूर्वक जबर दुखापत करणे, मालमत्ता जबरीने ताब्यात घेण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, घातक हत्याराने सज्ज होऊन गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, शिवीगाळ- दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे, तसा प्रयत्न करणे, असे शरीराविषयक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी ग्रामीण पोलिसांनी टोळीतील सदस्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम ५५ नुसार तडीपारीची कारवाई केली होती.

तरीपण, त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. १६ जून रोजी त्यांनी एकत्रित येऊन खुनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर गुन्हा केला होता. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिस महानिरीक्षकांना मोक्काअंतर्गत कलम वाढविण्याचे अधिकार असल्याने पोलिस अधीक्षकांनी अकलूज पोलिस ठाण्याकडून आलेला प्रस्ताव महानिरीक्षकांना पाठविला होता. त्यानुसार पोलिस महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी अकलूजमधील त्या टोळीवर ‘मोक्का’चे कलम लावले आहे.

वर्चस्व राखण्यासाठी टोळीचे सतत गुन्हे

टोळीचे वर्चस्व आपल्या हद्दीत कायम राहावे, त्यातून टोळीचा फायदा व्हावा, बेहिशेबी मालमत्ता जमविणे अशा प्रयत्नातून १३ जणांची टोळी सतत गुन्हे करीत होती. त्यामुळे त्यांच्यावर आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ नुसार ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली आहे. त्यात लक्ष्मण बंदपट्टे, शंकर काळे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली काळे, राजू काळे, अर्जुन चौगुले, अतुल काळे, आकाश धोत्रे, बाळू मदने, रोहित काळे, सलिम तांबोळी, मनोज काळे, किशोर नवगन (सर्वजण रा. इंदिरा नगर घरकूल, अकलूज) व बाजीराव सरगर (रा. खुडूस) या सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com