Solapur: सोलापूर जिल्ह्यातील वाघाला पकडण्यासाठी येडशी परिसरात सापळा; दिवसा बेशुद्ध करून वाघाला पकडण्याचे ताडोबातील पथकाचे नियोजन

वाघाला पकडणारे ताडोबा अभयारण्यातील पथकाने मंगळवारी येडशी येथील रामलिंग अभयारण्य व आसपासच्या परिसराची (वाघ ज्याठिकाणी आढळला त्या ठिकाणी) पाहणी केली. वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी रामलिंग अभयारण्यासह इतर तीन ते चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.
solapur tiger
tigerSakal
Updated on

सोलापूर : वाघाला पकडणारे ताडोबा अभयारण्यातील तज्ज्ञांचे पथक सोमवारी बार्शीत दाखल झाले आहे. मंगळवारी (ता. १४) या पथकाने येडशी येथील रामलिंग अभयारण्य व आसपासच्या परिसराची (वाघ ज्याठिकाणी आढळला त्या ठिकाणी) पाहणी केली. वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने रामलिंग अभयारण्यासह इतर तीन ते चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. वाघाला बेशुद्ध करून पकडण्याचे नियोजन या पथकाकडून करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी १० वाजता तज्ञांच्या पथकाने रामलिंग अभयारण्य व ढेंबरेवाडी वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर असलेल्या तलाव परिसरासह विविध ठिकाणी पाहणी केली. या पथकाने वाघाचा वावर असलेल्या मार्गावर त्याला मिळणारे खाद्य, पाणी पिण्याची ठिकाणी, त्याचे वास्तव्य अशा बाबींची पाहणी व अभ्यास सुरू केला आहे. तज्ज्ञांच्या मोहिमेने भीतीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वाघ सुरक्षितपणे जेरबंद होईल, अशी अपेक्षा आहे. वन विभागाने या मोहिमेला प्राधान्य देत नागरिकांना सहकार्य करण्याचेही आवाहन केले आहे.

तीन जिल्ह्यांच्या परिसरात पाहणी

ताडोबा येथील तज्ज्ञ पथकाने डोंगराळ भागातील तब्बल १० ते १२ किलोमीटर परिसराची पाहणी करून वाघासंदर्भातील माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर, धाराशिव, लातूर, उदगीर, भूम, आणि बार्शी येथील वन अधिकारी, कर्मचारी, प्राणीमित्र, वनमित्र उपस्थित होते.

अत्याधुनिक साधनांचा वापर, नागरिकांना प्रवेशबंदी

येडशी अभयारण्य आणि आसपासच्या भागात नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी म्हणून नागरिकांना जंगलात प्रवेश न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाघाला जेरबंद करण्यासाठी अत्याधुनिक साधने व पद्धतींचा वापर केला जाणार आहे.

दिवसा पकडावे लागणार वाघाला

दिवसभर वाघ ज्या मार्गावरून वावरला त्या मार्गांची पाहणी केली आहे. रामलिंग अभयारण्य परिसरात १० कॅमेरे लावण्यात आले आहेत. यामुळे वाघाच्या हालचाल दिसेल अशी अपेक्षा आहे. वाघ आढळल्यानंतर बेशुद्धीचे इंजेक्शन दिले जाईल. त्यानंतर अर्ध्या तासाने अंदाज घेऊन त्याला पकडण्यात येईल. रात्रीच्या वेळी वाघाला पकडणे जोखीमीचे असल्याने त्यास दिवसाच पकडावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी शेत, जंगलात एकटे जाऊ नये. सकाळी लवकर व सायंकाळी उशिरापर्यंत एकट्याने फिरू नये.

- डॉ. रविकांत खोब्रागडे, पथकप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com