Big Breaking ! विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी मिळणार नाही... कोण म्हणाले? नक्‍की वाचा 

तात्या लांडगे 
Saturday, 8 August 2020

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रथम व द्वितीय वर्षात शिकत असलेले सुमारे 45 हजार विद्यार्थी आहेत. त्यांची परीक्षा रद्द होऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या सत्रात तथा वर्गात प्रवेश मिळाला आहे. त्यांच्या परीक्षा शुल्कातून विद्यापीठास सुमारे अडीच ते तीन कोटी मिळाले आहेत. दुसरीकडे, विद्यापीठात सुमारे दोनशे कर्मचारी कंत्राटी असून त्यांचे मानधन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातून दिले जाते. त्यामुळे परीक्षा शुल्कमाफी करणे विद्यापीठाला अशक्‍य असून विद्यार्थ्यांनी तथा विद्यार्थी संघटनांनी शासनाकडून तो निर्णय मान्य करून घ्यायला हवा. शासनाने शुल्कमाफीचा निर्णय घेतल्यास त्यानुसार कार्यवाही होईल, असेही विद्यापीठाने सांगितले. 

सोलापूर : प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर त्यांना मागील सत्रातील निकालानुसार उत्तीर्ण करण्याचा निर्णय झाला. परीक्षा न झाल्याने या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत मिळावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेने केली आहे. मात्र, विद्यापीठात सुमारे दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन या परीक्षा शुल्कातून दिले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार नाही, असे स्पष्टीकरण पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने दिले आहे. तर राज्यातील कोणत्याच विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ केलेले नाही, याचीही आठवण सोलापूर विद्यापीठाने या वेळी करून दिली. 

हेही वाचा : ब्रेकिंग! परजिल्ह्यात व परराज्यात जाण्यासाठी बनावट पास देणारी टोळी जेरबंद 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रथम व द्वितीय वर्षात शिकत असलेले सुमारे 45 हजार विद्यार्थी आहेत. त्यांची परीक्षा रद्द होऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या सत्रात तथा वर्गात प्रवेश मिळाला आहे. त्यांच्या परीक्षा शुल्कातून विद्यापीठास सुमारे अडीच ते तीन कोटी मिळाले आहेत. दुसरीकडे, विद्यापीठात सुमारे दोनशे कर्मचारी कंत्राटी असून त्यांचे मानधन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातून दिले जाते. त्यामुळे परीक्षा शुल्कमाफी करणे विद्यापीठाला अशक्‍य असून विद्यार्थ्यांनी तथा विद्यार्थी संघटनांनी शासनाकडून तो निर्णय मान्य करून घ्यायला हवा. शासनाने शुल्कमाफीचा निर्णय घेतल्यास त्यानुसार कार्यवाही होईल, असेही विद्यापीठाने सांगितले. 

हेही वाचा : कर्मचाऱ्यांना कोरोना अन्‌ रेशन दुकानदारांच्या संपामुळे मिळेना केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य 

विद्यार्थी संघटनांचे तोंडावर बोट 
विद्यार्थ्यांचे प्रश्‍न अन्‌ त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (युवासेना) या पक्षांच्या विद्यार्थी संघटना प्रत्येक विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. मात्र, प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द होऊनही राज्यातील 13 पैकी एकाही अकृषी विद्यापीठाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतलेला नाही. राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची सत्ता असतानाही या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी परीक्षा शुल्क माफीबाबत तोंडावर बोट ठेवले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर या संघटनांना विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांचा विसर पडला की काय, असा प्रश्‍न विद्यार्थी विचारू लागले आहेत. 

शासन स्तरावरून निर्णय अपेक्षित 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा म्हणाले, विद्यापीठ ही विद्यार्थी हित जोपासणारी सेवाभावी संस्था आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कमाफीची मागणी केली जात आहे. मात्र, त्याबाबत शासन स्तरावरून निर्णय अपेक्षित आहे. परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय विद्यापीठ घेऊ शकत नाही. राज्यातील कोणत्याही विद्यापीठाने तसा निर्णय घेतलेला नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur University has clarified that students will not get examination fee waiver