चला, पाहू सूर्यग्रहण!

Solar eclipse
Solar eclipse
Updated on

पुणे - तब्बल दशकभराच्या प्रतीक्षेनंतर पुणेकरांना गुरुवारी (ता. २६) खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी सूर्याला ग्रहण लागेल. त्याचा मध्य ९ वाजून २३ मिनिटांनी होईल, तर ग्रहणाचा शेवट १० वाजून ५७ मिनिटांनी होईल. बाजारात मिळणाऱ्या ‘सोलर इक्‍लिप्स गॉगल’ आणि दुर्बिणीच्या साह्याने नागरिक हे सूर्यग्रहण पाहू शकतात. याशिवाय, शहरात जागोजागी विविध खगोलप्रेमी संस्था आणि महाविद्यालयांनी ग्रहण पाहण्यासाठी व्यवस्था केली आहे.

ग्रहण कसे लागते
सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्राची गोलाकार गडद सावली पृथ्वीवर पडते. यालाच आपण सूर्याला ग्रहण लागले, असे म्हणतो. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे ही सावली वेगाने जमिनीवरून प्रवास करते. पृथ्वीच्या ज्या भागांवरून ही सावली प्रवास करते, त्या भागांमध्ये खग्रास किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते.

असा बनवा ‘पिनहोल कॅमेरा’
काळा कार्डशीट पेपर, फॉइल पेपर, ट्रेसिंग पेपर आणि फेविकॉल इतक्‍याच साधनांची ‘पिनहोल कॅमेरा’ बनविण्यासाठी आवश्‍यकता असते. काळ्या कार्डशीट पेपरच्या नळीच्या एका बाजूला फॉइल पेपर, तर दुसऱ्या बाजूला ट्रेसिंग पेपर लावला जातो. फॉइल पेपरला पाडलेल्या छोट्याशा छिद्रातून सूर्याचा प्रकाश दुसऱ्या बाजूकडील ट्रेसिंग पेपरवर पडतो. ट्रेसिंग पेपरवर पडलेली सूर्याची प्रतिमा उलटी असते. याद्वारे सूर्यग्रहण पाहता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
aaple sarkar seva kendra
Marathi News Esakal
www.esakal.com