esakal | संजय राऊत घेणार असलेली शरद पवारांची प्रकट मुलाखत रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut takes Sharad Pawars open interview has canceled

पुण्यातील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार होती. ती रद्द करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत ही प्रकट मुलाखत घेणार होते. 

संजय राऊत घेणार असलेली शरद पवारांची प्रकट मुलाखत रद्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार होती. ती रद्द करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत ही प्रकट मुलाखत घेणार होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

का केली मुलाखत रद्द?
येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दिनांक 28 आणि 29 रोजी आयोजित 19 व्या साहित्यिक कलावंत संमेलनातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नियोजित प्रकट मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत ही मुलाखत घेणार होते. मात्र, राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे ही मुलाखत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसातच ही मुलाखत आयोजित करण्यात येईल. तसेच दिनांक 28 आणि 29 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे येथे आयोजित 19 व्या साहित्यिक कलावंत संमेलनातील उर्वरित सर्व कार्यक्रम नियोजित वेळेतच होणार आहेत, असे साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आणि सचिव वि. दा. पिंगळे यांनी कळविले आहे.

पुणे : उधारी मागतोस का? तुझा धंदा बंद करेल? 

मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली. दिल्लीत कॉंग्रेसचे आज राजघाटावर एनआरसी कायद्याविरोधात आंदोलन असल्याने सर्व नेते व्यग्र होते. त्यातच झारखंड विधानसभा निकाल असल्याने प्रमुख नेत्यांना जबाबदारी देण्यात आली होती. झारखंडमध्ये सत्तास्थापनेचा पेच झाला, तर त्याबाबतची ठोस काळजी घेण्यासाठी हायकमांडमधील प्रमुख नेते लक्ष ठेवून होते. त्यामुळे मागील दोन-तीन दिवसांत कॉंग्रेसकडून मंत्रिपदाच्या उमेदवारांची यादी अंतिम झाली नसल्याची माहिती आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेटील बोलावले होते

उद्यापर्यंत ही यादी अंतिम होऊ शकते. मात्र, त्यानंतर 25 व 26 ला मुख्यमंत्री नियोजित कार्यक्रमासाठी मुंबईबाहेर आहेत. त्यातच 26 ला सूर्यग्रहण व अमावास्या असल्याने विस्तार नको, अशी काही नेत्यांची मागणी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्तार 27 डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्‍यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे 14, कॉंग्रेसचे 10 व शिवसेनेचे 12 मंत्री शपथ घेतील, असा दावा केला जात असला; तरी तूर्तास संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्‍यता कमी आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीसह शिवसेना काही मंत्रिपदे रिक्‍त ठेवेल, असे मानले जाते.