esakal | राज्यात खरिपाची 82.98 टक्के पेरणी; पुणे विभागात 100 टक्‍यांपेक्षा अधिक पेरा 
sakal

बोलून बातमी शोधा

Sowing 82 per cent of kharif in the state sowing more than 100 per cent in Pune division

39 लाख हेक्‍टरवर कापसाचे पीक 
राज्यात कापसाचे 41 लाख 78 हजार 411 लाख हेक्‍टर सरासरी क्षेत्र असून 39 लाख 83 हजार 203 लाख हेक्‍टर (95 टक्के) पेरणी झाली आहे. सोयाबीनचे 38 लाख 80 हजार 244 लाख हेक्‍टर सरासरी क्षेत्र असून 38 लाख 17 हजार 539 लाख हेक्‍टर क्षेत्रात (98 टक्के) पेरणी झाली आहे. मकेची सरासरी क्षेत्राच्या 93 टक्के, उडीद 88 टक्के, भुईमूग 87 टक्के, तूर 86 टक्के, बाजरी 81 टक्के, मूग 71 टक्के, खरीप ज्वारी 50 टक्के व भाताची 24 टक्के पेरणी झाली आहे. 

राज्यात खरिपाची 82.98 टक्के पेरणी; पुणे विभागात 100 टक्‍यांपेक्षा अधिक पेरा 

sakal_logo
By
प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : यंदाच्या हंगामात राज्यात आतापर्यंत 82.98 टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. पुणे विभाग खरीप पेरणीत राज्यात आघाडीवर असून कोकणात सर्वात कमी पेरणी झाली आहे. पुणे विभागात 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. राज्यात कापूस व सोयाबीन या पिकांचे पेरणी झालेले सर्वाधिक क्षेत्र आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. 
1 जुलै ते 13 जुलै कालावधीत राज्यातील सरासरी पाऊस 343.4 मिलिमीटर असून 13 जुलै 2020 पर्यंत 362.9 मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या 104.8 टक्के पाऊस झाला आहे. यंदा राज्यात 13 जुलैअखेर पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत एकूण 355 तालुक्‍यांपैकी नऊ तालुक्‍यात 25 ते 50 टक्के, 50 तालुक्‍यात 50 ते 75 टक्के, 82 तालुक्‍यात 75 ते 100 टक्के तर 214 तालुक्‍यात 100 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 
राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 141.99 लाख हेक्‍टर असून 13 जुलैअखेर 117.82 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (82.98 टक्के) पेरणी झाली आहे. तसेच राज्यात खरीप पिकांचे उसासह सरासरी क्षेत्र 151.34 लाख हेक्‍टर असून 118.72 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (78.4 टक्के) पेरणी/लागवड झाली आहे. कोकणात खरिपाचे सरासरी क्षेत्र 4.42 लाख हेक्‍टर असून 0.98 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (22.14 टक्के) पेरणी झाली आहे. भाताची 35 हजार 664 तर नाचणीची चार हजार 343 हेक्‍टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. नाशिक विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र 21.19 लाख हेक्‍टर असून 17.98 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (84.86 टक्के) पेरणी झाली आहे. पुणे विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र 8.87 लाख हेक्‍टर असून 9.36 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (107.95 टक्के) पेरणी झाली आहे. 
कोल्हापूर विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र 8.14 लाख हेक्‍टर असून 6.89 लाख हेक्‍टर क्षेत्रात (84.62 टक्के) पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र 20.23 लाख हेक्‍टर असून 19.37 लाख हेक्‍टर क्षेत्रात (95.28 टक्के) पेरणी झाली आहे. लातूर विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र 27.94 लाख हेक्‍टर असून 23.52 लाख हेक्‍टर क्षेत्रात (84.17 टक्के) पेरणी झाली आहे. अमरावती विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र 32.13 लाख हेक्‍टर असून 28.66 लाख हेक्‍टर क्षेत्रात (89.18 टक्के) पेरणी झाली आहे. नागपूर विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र 19.26 लाख हेक्‍टर असून 11.16 लाख हेक्‍टर क्षेत्रात (57.95 टक्के) पेरणी झाली आहे. 

संपादन : वैभव गाढवे