'सपा'चं ठरलं! अबू आझमी देणार महाविकास आघाडीला समर्थन

sp abu azmis announces support to mahavikas aghadi for rajya sabha elections uddhav thackeray meeting
sp abu azmis announces support to mahavikas aghadi for rajya sabha elections uddhav thackeray meeting

मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकारण चांगलंच पेटलं आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सपा नेते अबू आझमी यांची नाराजी दूर झाली आहे. समाजवादी पार्टी महाविकास आघाडीला समर्थन देणार आहे. (sp abu azmis announces support to mahavikas aghadi for rajya sabha elections uddhav thackeray meeting)

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना सपा समर्थन देणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी सपा नेत्यांच्या मागण्या मान्य केल्या असून, त्याची लवकरच अंमलबजावणी देखील करणार आहेत अशी माहिती अबू आझमी यांनी दिली आहे. भाजपला हरवण्यासाठी शिवसेनेला सहकार्य करणार असे देखील त्यांनी सांगितले आहे.

sp abu azmis announces support to mahavikas aghadi for rajya sabha elections uddhav thackeray meeting
उद्या औरंगाबादच्या नामांतराची घोषणा होणार? संभाजीराजेंच्या पुतळ्यावरून चर्चा

यापूर्वी सपाचे नेते अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न केले होते, त्यांनी "राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता. यानंतर मी त्यांना पत्र लिहिलं असून यासंदर्भात काही प्रश्न विचारले आहेत. माझ्या या पत्राला उत्तर मिळाल्यानंतर आम्ही विचार करु की, राज्यसभेत कोणाला मत द्यायचं. महाविकास आघाडीला आमचा अजूनही पाठिंबा आहे, पण माझ्या प्रश्नांची उत्तर मला आधी मिळायला हवीत" असे म्हटले होते. त्यामुळे सपा नेमकं कोणाला मत देणार याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांनंतर आज ठाकरेंच्या बैठकीनंतर त्यांची नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

sp abu azmis announces support to mahavikas aghadi for rajya sabha elections uddhav thackeray meeting
पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्यानंतर चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com