Ramdas Kadam: सुभाष देसाईंवर बोलताना रामदास कदमांची जीभ घसरली; म्हणाले तो देसाई***

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray esakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये आज सभा पार पडली. येथे शिवसेनेचा भगवा झंझावात उभा करण्यासाठी आज शहरातील गोळीबार मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमिवर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray
Politics: महायुतीत फूट! रासपचा स्वबळाचा नारा, महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितलं...

ते म्हणाले, उद्धवजी बाळासाहेब म्हणाले होते, ज्या वेळी मला काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाण्याची वेळ येईल त्यावेळी मी शिवसेना नावाचं दुकान बंद करीन. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी उद्धवजी तुम्ही गद्दारी का केली? २००९ मध्ये मला गुहागर मधून तिकीट दिलं. मी दापोली मधून मागीतलं होतं. तिथं आपल्याचं एका नेत्याला सांगून मला पाडलं.

कशासाठी तर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होत म्हणून. राज्याचा विधानसभेचा विरोधीपक्षनेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो. कदाचीत शिवसेना प्रमुखानी मला मुख्यमंत्री मला केलं असतं. पण मी मुख्यमंत्री व्हायला नको म्हणून तुम्ही मला २००९ मध्ये पाडलत. असा गंभीर आरोप देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

Uddhav Thackeray
सत्तासंघर्षाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर काय घडेल? वाचा तज्ञ काय म्हणतात supreme court

तर सुभाष देसाई यांच्यावर बोलताना रामदास कदम यांची जिभ घसरली. ते म्हणाले योगेश कदमला पाडण्यासाठी सुभाष देसाई** शेळी मेंढी** सगळ्यात पुढं असायचा. तर पुढं म्हणाले, बाळासाहेब ठाकरे रामदास कदम सारखे वाघ पाळायचे आणि तुम्ही सुभाष देसाई सारख्या शेळ्या मेढ्यांना पाळताय हा तुमच्यामधील फरक आहे. अशा शब्दा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com