दिवाणी कैद्यांसाठी आता विशेष बराकी 

मंगेश सौंदाळकर
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुंबई - राज्यात पहिल्यांदाच दिवाणी कैद्यांसाठी भायखळा तुरुंगात विशेष बराकींची व्यवस्था केली जाणार आहे. याबाबत तुरुंग प्रशासनाने तयार केलेला प्रस्ताव लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवला जाणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मुंबई - राज्यात पहिल्यांदाच दिवाणी कैद्यांसाठी भायखळा तुरुंगात विशेष बराकींची व्यवस्था केली जाणार आहे. याबाबत तुरुंग प्रशासनाने तयार केलेला प्रस्ताव लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवला जाणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

गृह विभागाच्या अखत्यारीत राज्यातील नऊ मध्यवर्ती, 31 जिल्हा, 13 खुले तुरुंग आणि 172 उपतुरुंग आहेत. महिलांसाठी भायखळा आणि पुणे येथे वेगळे तुरुंग आहेत. तुरुंगांतील कैद्यांची वाढती संख्या ही तुरुंग प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय झाली आहे. विशेष म्हणजे, किरकोळ हाणामारी, साधी चोरी आणि अमली पदार्थांचे व्यसन आदी प्रकरणांत अटक केलेल्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरातील तुरुंगांच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

आर्थिक गुन्ह्यांबद्दल अटक केलेल्या आरोपींना दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार वेगळे ठेवणे आवश्‍यक असते; परंतु राज्यात अशा प्रकारची सुविधा नाही. म्हणूनच तुरुंग प्रशासनाने दिवाणी कैद्यांसाठी विशेष बराकी बांधण्याचे ठरवले आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा कारागृहात अशा बराकी बांधण्यात येणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) राज वर्धन यांनी सांगितले. 

या बराकींसाठी भायखळा तुरुंगातील एका जागेची निवड केली जाणार आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तांत्रिक सर्वेक्षण करून बराकी बांधण्याचा तुरुंग प्रशासनाचा विचार आहे. गृह विभागाशी चर्चा करून बराकींच्या संख्येबाबत निर्णय घेतला जाईल. अशा प्रकारची सुविधा असलेला हा राज्यातील एकमेव तुरुंग ठरणार आहे. 

घरचे जेवण, साधे कपडे 
दिवाणी कैदी कायद्यानुसार साध्या गुन्ह्यांतील कैद्यांना गंभीर गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांपासून वेगळे ठेवावे लागते. या दिवाणी कैद्यांना घरचे जेवण मागवण्याची आणि साधे कपडे घालण्याची मुभा असते. या कैद्यांना तुलनेने साधी शिक्षा झालेली असते. त्यामुळे भायखळ्यातील दिवाणी कैद्यांच्या बराकी तुरुंग प्रशासनासाठी उपयुक्त ठरतील, असे गृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

राज्यातील तुरुंग 
9 : मध्यवर्ती 
31 : जिल्हा 
13 : खुले 
172 : उपतुरुंग 

Web Title: special barracks for civil prisoners