मुंबई - ‘अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी आर्थिक गुप्तचर विभाग कार्यरत केला असून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केले.