

Santosh Deshmukh Case Update: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर पोस्टद्वारे माहिती दिली आहे.