शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी ‘विशेष शोध मोहीम राबविणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 February 2021

कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत कुटूंबांसमवेत स्थलांतरित झालेली लाखो विद्यार्थी गेली वर्षभर शिक्षणापासून दुरावली गेली आहेत. या विद्यार्थ्यांसह अन्य शालाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उशिरा का होईना राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

पुणे - कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत कुटूंबांसमवेत स्थलांतरित झालेली लाखो विद्यार्थी गेली वर्षभर शिक्षणापासून दुरावली गेली आहेत. या विद्यार्थ्यांसह अन्य शालाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उशिरा का होईना राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. आता राज्यात शाळाबाह्य बालकांना शोधण्यासाठी १ ते १० मार्च या कालावधीत ‘विशेष शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेत ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील, या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन आठवड्यांपूर्वी (९ फेब्रुवारी)5 संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी ‘विशेष शोध मोहीम राबविण्यात बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर ही मोहीम प्रत्यक्षात राबविण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य5 सचिव वंदना कृष्णा यांनी मंगळवारी अध्यादेश काढला आहे. विशेष शोध मोहिमेतंर्गत राज्य, जिल्हा, तालुका, केंद्र, वॉर्ड, गाव अशा विविध स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

पुण्यात दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ८ वाहने जप्त 

बालकांचा शोध येथे घेणार
- प्रत्येक गावात, शहरात गजबजलेल्या वस्त्या- रेल्वे स्टेशन, बस स्थानक- गुऱ्हाळ घर, वीटभट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या 
- झोपड्या, फुटपाथ, सिग्नल 
- लोककलावंताची वस्ती.... 

शोध मोहिमेची जबाबदारी
- नोडल अधिकारी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी 
- पर्यवेक्षक : केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षक 
- प्रगणक : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका/मदतीस...

एक साखरपुडा, तीन ठिकाणं आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

मोहिमेत याचा घेतला जाणार आधार
- ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका यामधील जन्माच्या नोंदीचा वापर 
- कुटुंब सर्वेक्षण करणे 
- तात्पुरते स्थलांतरित कुटुंबाची घेतली जाणार माहिती 
- मूळ वस्तीतून अन्य वस्तीत स्थलांतरित होणारी कुटुंबांच्या नोंदी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special search campaign launched bring out of school students into the stream