पुण्यात दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ८ वाहने जप्त

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

चंदननगर परिसरात सहा दुचाकी, तर हडपसर भागात दोन असे एकूण आठ दुचाकी चोरल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

रामवाडी (पुणे) : चंदननगर पोलिस ठाण्याकडून (मंगळवारी ता.23) वाहन चोरी करणाऱ्या चोरास सापळा रचून अटक करण्यात आली. आरोपीकडून 2,62000 रुपये किंमतीच्या एकूण आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 

खियाराम लालाराम मेघवाल (वय 23), चुनाराम लालाराम मेघवाल (वय 21), दिलखुश कुभाराम ठिगला (वय 19, सर्व सध्या राहणार खराडी) या तिघांना चोरीच्या मोटरसायकलसह पकडून त्यांच्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील कारवाई पोलिस उप आयुक्त पंकज देशमुख, येरवडा विभाग सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जाधव, सुनिल थोपटे (पोलिस निरीक्षक गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

पुणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी; लवकर करा अर्ज​

वडगाव शेरी भागात पेट्रोलिंग करत असताना तुषार भिवरकर यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन इसम चोरीची स्प्लेंडर मोटर सायकल (MH-04/ JA 9503) या गाडीवरून येत असल्याचे कळताच टेम्पो चौक वडगावशेरी येथे सापळा रचून पकडण्यात आले. हे तिन्ही इसम मूळचे राजस्थानचे आहेत. चंदननगर परिसरात सहा दुचाकी, तर हडपसर भागात दोन असे एकूण आठ दुचाकी चोरल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

बंटी-बबलीची जोडी, करते घरफोडी; बारामतीत १९ गुन्ह्यांचा भांडाफोड

सदर कारवाई चंदननगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन जाधव सहाय्यक पोलीस फौजदार पंडित गावडे, मोहन वाळके, युसफ पठाण, रोहिदास लवांडे, श्रीकांत गांगुर्डे, महेश नानेकर, अविनाश संकपाळ, अमित कांबळे, राहुल इंगळे, संदीप येळे, विक्रांत सासवडकर, अमित जाधव, सुभाष आव्हाड सचिन कोळी, परशुराम शिरसाट यांनी  केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune police have arrested three two-wheeler thieves