हरिश्चंद्र गडावर प्रथमच आढळल्या सोनसरी, श्रीरंगी वनस्पती! शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांचे संशोधन

Srirangi plant was first found on Harishchandra fort
Srirangi plant was first found on Harishchandra fort

अकोले : पश्चिम जैवविविधतेने नटलेला आहे. या परिसरात आढळणारी जैव संपदा जगात कुठेच आढळत नाही. ही संपदा पर्यावरणाच्या दृष्टीने तर महत्त्वाची आहेच, परंतु मनुष्य प्राण्यांच्या आजारांवरही तिची मात्रा चालते. सह्याद्रीच्या कुशीतही ती संपदा सापडते. विशेष म्हणजे त्यात नव्या वनस्पतींची भर पडली आहे. ही वनस्पती प्रथमच या घाटात आढळली आहे.

हरिश्‍चंद्रगड, सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर "पिंदा' (श्रीरंगी) या नव्या फुल वनस्पतीचा शोध लागला आहे. जैव विविधतेने नटलेल्या सह्याद्री गिरीशिखरात आणखी एका जागतिक स्तरीय फुल वनस्पतीची भर पडली. डॉ. कुमार विनोद गोसावी व त्यांच्या टीमने तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर हे संशोधन केले आहे. यापूर्वीही त्यांनी सोनसरी या फुल वनस्पतीचा शोध लावला होता.

सह्याद्रीचा पश्‍चिम घाट, म्हणजे जैव विविधतेने नटलेला जागतिक वारसाच. त्यात आणखी एका संशोधनाची भर पडली. गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी. आर्टस व आर.वाय.के. सायन्स कॉलेजचे सहायक प्राध्यापक डॉ. कुमार विनोद गोसावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हरिश्‍चंद्रगडाच्या पर्वतरांगेत पिंदा (श्रीरंगी), चांदोरे व विको गोखलेई या नव्या जागतिक स्तरीय फुल वनस्पतींचा शोध लावला आहे.

या वनस्पती कोशिंबीर कुळातील असून, त्याचा गण पिंदा हा उत्तर सह्याद्री डोंगररांगेत सापडतो. याआधी फक्त पिंदा कोक्‍नेसीस या एकाच प्रजातीची नोंद झालेली आहे. 

स्वीडनमध्ये 17 जुलै रोजी प्रकाशित झालेल्या "नॉर्डिक जनरल ऑफ बॉटनी' या जागतिक दर्जाच्या नियतकालिकात त्याची नोंद झाली आहे. "विकोआ गोखलेई' ही फुल वनस्पती सूर्यफुल कुळातील असून, तिला "सोनसरी' असे म्हटले जाते. ती पश्‍चिम घाटात आढळते. सोनसरीच्या जगात 14 प्रजाती आढळतात. हरिश्‍चंद्रगड, रतनवाडी भागात डॉ. विक्रम भोसले यांना ही वनस्पती नजरेस पडली. फुले, पाने, रंग, बियांचा आकार याच्या सखोल अभ्यासाअंती "विकोआ गोखलेई' तिच्या इतर प्रजातीपेक्षा भिन्न ठरते. 

वनस्पतीला दिले प्राध्यापकांचे नाव 
डॉ. कुमार विनोद गोसावी म्हणाले, ""विज्ञानाला माहीत नसणारी "पिंदा' गणातील वनस्पती पहिल्यांदा हरिश्‍चंद्रगड येथे मिळाली. शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्र विभागाचे प्रा. श्रीरंग रामचंद्र यादव यांच्या मोलाच्या मार्गदशनामुळे या प्रजातीला त्यांचेच "पिंदा' (श्रीरंगी) हे नाव दिले. तसेच सूर्यफूल कुळातील दुसऱ्या वनस्पतीला गोखले एज्युकेशन सोसायटीचे "विकोआ गोखलेई' हे नाव दिले.

या दोन्ही वनस्पती वैज्ञानिदृष्ट्या हरिश्‍चंद्रगड येथून पहिल्यांदा शोधल्या. पिंदा वनस्पती सध्या फक्त हरिश्‍चंद्रगडावरच आढळते, तर "विकोआ गोखलेई' सह्याद्रीच्या उंच तुरळक भागात आढळते. दोन्ही वनस्पती दुर्मिळ असून, त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.'' अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com