esakal | हुश्श..! दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर आज संपली
sakal

बोलून बातमी शोधा

ssc exam

हुश्श..! दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर आज संपली

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद: इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच यंदा दहावीची परीक्षा न घेता निकाल जाहीर केला आहे. गेले एक महिन्यापासून निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून होते. मात्र आज अखेर ऑनलाईन निकाल जाहीर केल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली. राज्याचा एकूण निकाल पाहिला तर ९९.९५  टक्के लागला आहे. तर औरंगाबाद  विभागाचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. दहावीत यंदा मुले ९९.९४ टक्के तर मुली ९९.९६ टक्के उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सर्वाधिक आहे.

कोरोनाने मागील वर्षी दहावीच्या परीक्षा सुरू असतानाच गोंधळ घातला होता. त्यामुळे मागील वर्षी दहावीचा भूगोलचा पेपर रद्द करण्याची वेळ राज्यमंडळावर आली होती. त्यातच यंदाही कोरोनाचा कहर कायम राहिला त्यामुळे आणखी चिंता वाढली. विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला अर्जही भरले, परीक्षेच्या तारखा देखील जाहीर झाल्या होत्या.  मात्र एन परीक्षेच्या वेळी कोरोना पुन्हा आला आणि परीक्षा घेण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे परीक्षा रद्द करून मूल्यांकन करूनच निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज राज्यमंडळाच्या वतीने ऑनलाईन निकाल जाहीर केला आहे. यंदा एकूण १५ लाख ७५ हजार ८०६  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार ७५२ पैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा एकूण निकाल हा ९९.९५ टक्के लागला असून गेल्या वर्षीपेक्षा ४ टक्के वाढ निकालात झाली आहे.

हेही वाचा: राज्य शिक्षण मंडळाचे पोर्टल हँग, शिक्षक त्रस्त

९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

गेल्या वर्षीपेक्षा यंदा ५ टक्के जास्त विद्यार्थ्यांना यावेळी १०० टक्के गुण मिळाले आहेत. दहावीत ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर ८३ हजार ९६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.  तर ८३ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहुन अधिक गुण मिळाले आहे.

औरंगाबाद विभागाचा ९९.९६ टक्के निकाल

औरंगाबाद विभागाचा एकूण निकाल पाहिला तर त्यात १ लाख ७६ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७६ हजार २९० विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. त्यापैकी १ लाख ७६ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.  औरंगाबादचा एकूण निकाल ९९.९६ टक्के लागला.

हेही वाचा: पंकजा मुंडेंना मोठा धक्का! वैद्यनाथ कारखान्याचे बँक खाते सील

राज्यातून कोकण विभाग अव्वल

राज्यात कोकण विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून कोकण विभाग यंदा दहावीच्या निकालात अव्वल ठरला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल ९९.८४ टक्के सर्वाधिक कमी लागला आहे. याशिवाय औरंगाबाद विभागाचा निकाल पाहिला तर ९९.६ टक्के लागला आहे. पुणे ९९.९६ टक्के तर मुबंई ९९.९६, कोल्हापूर ९९. ९२, अमरावती ९९.९८, नाशिक ९९.९६, लातूर विभागाचा ९९.९६ टक्के लागला आहे.

loading image