भाजपा स्वयंघोषित देशभक्त: राधाकृष्ण विखे पाटील

गोविंद साळुंखे
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

शिर्डी (नगर): जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. परंतु, दहावीच्या नवीन पाठ्यपुस्तकात भारताचा सदोष नकाशा व राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आला आहे. भूगोलच्या पुस्तकात झालेली चूक अक्षम्य आहे. दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (शुक्रवार) पत्रकारांशी बोलताना केली.

विखे पाटील म्हणाले, 'जम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. सत्तेपूढे देशप्रेमाला दुय्यम स्थान आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री तर पाकिस्तानचे दलाल आहेत. काश्मीरमध्ये स्वाभिमान असेल तर भाजप ने सत्ता सोडावी व तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. भाजपा स्वयंघोषित देशभक्त आहे.'

शिवसेना म्हणजे गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा
महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री हवा हे समजायला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना चार वर्षे लागली. नगरमध्ये हत्या झाल्या नंतर उद्धव ठाकरेंना हे शहाणपण सुचले आहे. हे शहाणपण यायला सुद्धा चार वर्ष लागली. नाणार प्रकल्पाला विरोध करणारे सेनेचे मंत्री मात्र मंत्रिमंडळ बैठकीत गप्प बसतात. शिवसेना म्हणजे गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा आहे. सत्तेत राहून भाजपवर टीका म्हणजे हा ढोंगीपणाचे लक्षण आहे, असेही शिवसेनेवर टीका करताना विखे पाटील म्हणाले.

सरकारच प्रत्येक काम कागदावरच पूर्ण
या सरकारच प्रत्येक काम कागदावरच पूर्ण दिसत आहे. हे सरकार गेमचेंजर नसून नेमचेंजर आहे. स्वतःच्या नागपूर जिल्ह्यात 70 टक्के लोकांना शौचालय नाही. गाव निहाय हागणदारी गावची माहिती जाहीर करवी.
हागणदारी मुक्त गाव म्हणजे फसवी घोषणा आहे, असेही विखे पाटील म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ssc geography india map wrong and radhakrishna vikhe patil attack on bjp