
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी केली जात होती.
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षा ऑफलाइनच घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने निर्बंधांमधून सूट दिली आहे. तसंच परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यासाठी राज्य मंडळाकडून तयारी केली जात असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
'MPSC'ची परीक्षा होणार! अॅडमिड कार्ड काढून घ्या
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी केली जात होती. मात्र ऑनलाइन परीक्षा घेणं हे शहरी भागात योग्य असलं तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येऊ शकतात. नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य होणार नसल्यानंच परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबत निर्णय झाला आहे.
हेही वाचा - शरद पवारांनी घेतला लशीचा दुसरा डोस; म्हणाले, 'लस घेऊन सक्रिय सहभाग नोंदवा'
राज्यात दहावीसाठी जवळपास 17 लाख तर बारावीसाठी सुमारे 15 लाख विद्यार्थी असणार आहेत. दहावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार 29 एप्रिल ते 20 मे या कालवधीत तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत घेतली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा घ्यायची असेल तर एकाच वेळी 32 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागेल आणि त्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नाही. तसंच यामध्ये विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये जसा गोंधळ झाला तसाच होऊ शकतो.