SSC Result : दहावीचा निकाल उदया होणार जाहीर

ssc result 2019 maharashtra board declared
ssc result 2019 maharashtra board declared

पुणे : इयत्ता दहावीचा निकाल शनिवारी (ता. 8) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात एसएससी बोर्डाने दिली. गेल्यावर्षाही दहावीचा निकाल 8 जून रोजी लागला होता.  

सोशल मीडियावर 'दहावीचा निकाल आज जाहीर होणार' असा मेसेज काही दिवसांपासून फिरत होता. दहावी एसएससी बोर्डाचा निकाल सात जूनला जाहीर होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वायरल झाल्या होत्या. सोशल मीडियावर जुन्या लिंक पाठवून अफवा पसरवल्या जात होत्या. यामुळे दहावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि पालक हैराण झाले होते. सोशल मीडियावरून निकालाची तारीख व्हायरल होत असल्यामुळे अफवांना उधान आले होते. अखेर, दहावीचा निकाल शनिवारी दुपारी लागणार आहे, असे एसएससी बोर्डाने जाहीर केले आहे.

दरम्यान, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाचे वेध लागले होते. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे दहावी परीक्षा घेण्यात आली.

याठिकाणी पाहता येणार निकाल

कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचे नाव अश्विनी आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये ASH असे लिहावे लागेल. दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. त्यानंतर काही दिवसांनी आपापल्या शाळेतून विद्यार्थी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र घेऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com