esakal | परतीच्या हंगामासाठीही एसटी सज्ज; रविवार पर्यंत 1500 बसेस फुल
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

परतीच्या हंगामासाठीही एसटी सज्ज; रविवार पर्यंत 1500 बसेस फुल

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : एसटी महामंडळाने (ST bus corporation) मुंबई विभागातून (Mumbai) गौरी, गणपतीसाठी (Ganpati Festival) कोकणात (konkan) जाण्या येण्यासाठी तब्बल 4400 बसेसचे (buses) नियोजन केले असून, जाण्याचा हंगाम संपताच आता मंगळवार पासून परतीचा हंगामासाठी (Return journey) सुद्धा एसटी सज्ज झाली आहे. परतीसाठी सुद्धा एसटीने 2200 बसेस सज्ज ठेवले असून, रविवार पर्यंत 1500 बसेसचे ग्रुप, नॉर्मल बुकिंग (booking) झाले असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा: टाटा मेमोरियल रुग्णालयात रक्ताचा तीव्र तुटवडा; रक्तदानाचे एसबीटीसीचे आवाहन

परिवहन मंत्री अनिल परब यांनी 8 ऑगष्ट रोजी कोकणात जाणाऱ्या बसेसला हिरवी झंडी दाखवली होती. त्यांनतर एसटीने आपल्या बसेस रवाना केल्या केल्या होत्या. ज्यामध्ये अतिवृष्टीची झाल्यानंतरही कोकणात जाणाऱ्यांची गर्दी असल्याने महामंडळाने गणपती स्पेशल जादा गाड्या सोडल्या होत्या. तर मुंबई, ठाणे, पालघर विभागातील सर्वाधिक बसेस सोडण्यात आल्या.

आता मंगळवारी चाकरमाणे दोन आणि पाच दिवसांचा गणपती उत्सव साजरा करून पुन्हा आपल्या कर्तव्यावर परतणार आहे. मंगळवार पर्यंत एसटीचे बुकिंग वाढण्याची शक्यता सुद्धा एसटीने वर्तविली आहे. यामध्ये प्रवाशांच्या वाहतूकीची सेवा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महामंडळाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व सुरक्षित-सुरळीत वाहतूकीसाठी गस्ती पथके विशेष दक्षता घेणार आहेत. याशिवाय कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरूस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचण उद्भवल्यास 1800221250 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

loading image
go to top