esakal | टाटा मेमोरियल रुग्णालयात रक्ताचा तीव्र तुटवडा; रक्तदानाचे एसबीटीसीचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Blood Donation

टाटा मेमोरियल रुग्णालयात रक्ताचा तीव्र तुटवडा; रक्तदानाचे एसबीटीसीचे आवाहन

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत सध्या गणेशोत्सवाचे (Ganpati Festival) वातावरण असून अनेक चाकरमानी गावी गेले आहेत. अशातच मुंबईत तीव्र रक्त तुटवडा (less blood stock) भासू लागला आहे. मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये (Mumbai hospitals) पुरेसा रक्तसाठा उपलब्ध नसल्याची माहिती मिळत असून कर्करोगाच्या उपचारांसाठी (cancer treatment) प्रसिद्ध असलेल्या टाटा मेमोरियल रुग्णालयात तीव्र रक्त तुटवडा भासत असल्याने इथल्या रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रक्तदान (blood donation) होऊन रुग्णांना मदत व्हावी यासाठी टाटा रुग्णालयातर्फे (TATA hospital) आवाहन केले गेले आहे.

हेही वाचा: मुंबईत मलेरियाची रुग्णवाढ; घरातच सापडतोय डेंगींचा डास

टाटा रुग्णालयातील रक्तपेढीतून मिळालेल्या आकडेवारीनुसार, इथे रक्ताची बरीच चणचण भासत आहे, शिवाय, रक्तदान शिबिरे देखील भरवले गेले असून सध्या इतर रक्तपेढ्यांतून रक्ताची सोय केली जात आहे. दरम्यान, मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी साांगितले. डाॅ. थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, " रक्ताचा तुटवडा सध्या सगळी कडे आहे. कारण, लसीकरण चालू आहे आणि लोक हि रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत.

लसीकरणामुळे रक्तदान करता येत नाही आणि शिबिरे भरवली तरी प्रतिसाद मिळत नाही. आम्ही सर्व आयोजकांना पत्र व्यवहार वैगरे करून शिबीर आयोजित करायला सांगत आहोत पण लोकं लसीकरण आणि कोरोनाच्या भीतीने रक्तदान करायला पुढे येत नाहीत. रक्तपेढ्यांचे शिबिर भरवण्याचे  कर्तव्यच आहे, पण त्यांनाही जसा हवा तास प्रतिसाद मिळत नाही आणि आपलीच नाही तर सर्व राज्यांची हीच स्थिती आहे. लसीकरणाच्या 14 दिवसानंतर किंवा त्याआधी रक्तदानासाठी पात्र नागरिकांनी रक्तदान केले पाहिजे, असेही डॉ. थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील एकूण 56 रक्तपेढ्यांपैकी बर्‍याचशा रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठा पुरेसा उपलब्ध नसल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वेबसाइटवरील माहितीवरुन स्पष्ट होते.  पालिका आणि खासगी रुग्णालयाच्या रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा असल्याचे ही आकडेवारीवरून स्पष्ट होते. ए पाॅझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पाॅझिटिव्ह आणि निगेटिव्ह रक्तगटासह अनेक रक्त गटाच्या रक्त पिशव्या रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध नाहीत, त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे.

रक्ताची उपलब्धता

रक्तपेढी - युनिट

सायन - 16

सेंट जॉर्जेस - 12

ऩायर - 171

कूपर - 21

जीटी - 20

केईएम - 101

जेजे - 82

loading image
go to top