
मुंबई: परळ आणि प्रभादेवी परिसरास पूर्व-पश्चिमेस जोडणारा एल्फिन्स्टन पूल प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे एसटी परळ आगारातील बससेवेच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. पर्यायी मार्गावरील अंतर वाढल्याने तिकीटदरात एक टप्प्याने वाढ होणार असल्याने तिकीटदर १० रुपये वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळातून देण्यात आलेली आहे.