एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत संजय राऊतांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay-Raut

एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत संजय राऊतांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: राज्यात सध्या एसटी कामगारांचा संप सुरु आहे. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक विषयावर भाष्य केलंय. एसटी आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी म्हटलंय की, एसटी कर्मचाऱ्यांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातातील बाहुले बनू नये. संपापेक्षा, कामगारांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा भाजपला महाविकास आघाडीच्या बदनामीचं पडलंय, असं विधान त्यांनी केलंय. पुढे त्यांनी म्हटलंय की, ST महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही. भाजपमधील उपरे नाचताहेत, तर नाचू देत. सरकार कामगारांच्या बाजूनं आहे, असंही त्यांनी ठामपणे म्हटलंय.

हेही वाचा: गुजरातमध्ये 350 कोटींच्या ड्रग्जसह एकाला अटक; पाकिस्तान कनेक्शन?

संजय राऊत म्हणाले की, कामगारांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य केल्या आहेत. त्यांनी राजकीय पोळ्या भाजणाऱ्यांच्या हातातील बाहुलं बनू नये. त्यांनी स्वत:चं, एसटीचं आणि लोकांच्या भल्याचा विचार करावा. अनिल परबांचे पुतळे जाळणे हे राजकारण आहे. एसटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा यांना (भाजप) महाराष्ट्र सरकार बदनाम करणे जास्त महत्त्वाचं वाटतं. एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाहीये, हे सुधीर मुनगंटीवार यांनीच अर्थमंत्री असताना सांगितलं होतं. याक्षणी ते शक्य नाहीये तरीही भाजपचे नेते मुद्दाम हा विषय घेऊन नाचत आहेत. शेवटी राज्याचे सरकार कामगारांच्या बाजूने उभे आहे. अनेक बंधने सरकारवर आहेत. त्यामुळे कामगारांनी हे समजून घेतलं पाहिजे.

पुढे उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना त्यांनी म्हटलंय की, त्यांना मानेचा त्रास आहे. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. लवकरच ते सेवेत रुजू होतील. फार चिंता करण्यासारखी स्थिती नाही.

हेही वाचा: SpaceXने अंतराळात पाठवले चार प्रवासी; घडला पृथ्वीच्या इतिहासातील अनोखा रेकॉर्ड

पुढे ते म्हणाले की, द्वारकेत ड्रग सापडणे ही चिंतेचे गोष्टी. महाराष्ट्रातील पाव ग्रॅम ड्रग्स पकडलेल्या अधिकाऱ्यांनी या साडेतीनशे किलो ड्रग्जचा अभ्यास करावा. राज्यात पाव ग्रँम सापडले. आता वानखेडेंनी तिकडे पाहावे. चिखलात कोण लोळतंय, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. संपूर्ण मंत्रीमंडळ नवाब मलिकांच्या पाठिशी असल्याने नैतिक बळ प्राप्त झालं आहे. शेवटी सत्याचाच विजय होईल, असंही त्यांनी म्हटलंय.

loading image
go to top