SpaceXने अंतराळात पाठवले चार प्रवासी; घडला पृथ्वीच्या इतिहासातील अनोखा रेकॉर्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SpaceXने अंतराळात पाठवले चार प्रवासी; घडला पृथ्वीच्या इतिहासातील अनोखा रेकॉर्ड

SpaceXने अंतराळात पाठवले चार प्रवासी; घडला पृथ्वीच्या इतिहासातील अनोखा रेकॉर्ड

SpaceX’s Crew-3 Astronaut Launch: एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने आज पुन्हा एक अंतराळ यान अवकाशात पाठवलं आहे. आज गुरुवारी अमेरिकेची अंतराळ संस्था नासासोबत (NASA) मिळून चार अंतराळ प्रवाशांना (Astronauts in ISS) घेऊन जाणाऱ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे (ISS) यशस्वीरित्या लाँचिंग करण्यात आलंय. या अंतराळ यानात चार प्रवासी आहेत. मात्र, या अंतराळयानाने पृथ्वीची कक्षा पार करताच 60 वर्षांच्या इतिहासात 600 लोकांना अंतराळामध्ये घेऊन जाण्याचा एक अनोखा रेकॉर्ड बनला आहे. थोडक्यात, आतापर्यंत 600 लोक अंतराळात जाऊन आल्याचा हा रेकॉर्ड आहे.

हेही वाचा: पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण

स्पेसएक्सने अलिकडेच चार अंतराळ प्रवाशांना आपल्या अंतराळ यानाच्या माध्यमातून उड्डाण करत पुन्हा पृथ्वीवर सुखरुपरित्या आणलं आहे. या टीममध्ये जे अंतराळप्रवासी सामील होते त्यामध्ये एक अनुभवी स्पेसवॉकर आणि दोन युवा देखील सामील होते. नासाने यांना आपल्या येणाऱ्या चंद्र मोहिमेसाठी देखील निवडलं आहे.

हेही वाचा: Facebookवर मिळतात सरासरी 15 धमक्यांच्या, 5 प्रक्षोभक तर 3 द्वेषपूर्ण पोस्ट्स

कोण असेल अंतराळात जाणारा सहाशेवा व्यक्ती?

नासाने दिलेल्या माहितीनुसार, जर्मनीचे मथायस माउरर हे अंतराळात जाणारे 600 वे व्यक्ती असणार आहेत. त्यांच्यासोबत तीन सदस्य 24 तासांच्या आतच स्पेस स्टेशनवर पोहोचणार आहेत. नासा-स्पेसएक्सचे हे मिशन खराब हवामानाच्या कारणामुळे जवळपास एक आठवडा उशीरा लाँच झाले आहे.

loading image
go to top