ST Mahamandal : राज्यात अद्याप २५ पेक्षा अधिक डेपो मॅनेजरची पदे रिक्तच

डेपो मॅनेजर पदावर बढती देऊनही अधिकाऱ्यांचा रुजू होण्यास नकार
MSRTC
MSRTCsakal

मुंबई - एसटी महामंडळ प्रशासनाने पदोन्नतीने डेपो मॅनेजर पदावर नियुक्त्या केल्या आहे. मात्र, यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी आपला राजकीय वजन वापरून जिथे आहे तिथेच नियुक्ती करून घेतली आहे. तर काही अधिकाऱ्यांची अद्याप नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्यास नकारघंटा दिसते आहे.

परिणामी राज्यभरात २५ पेक्षा अधिक डेपो मॅनेजरची पद रिक्तच असून, प्रभारी डेपो मॅनेजरच्या भरवश्यावर एसटीच्या प्रवासी वाहतुकीचा कारभार सुरू आहे. नियुक्तीच्या ठिकाणी डेपो मॅनेजर रूजू न झाल्यास त्यांच्यावर निलंबणाच्या कारवाईचा इशारा कर्मचारी व वर्ग विभागाच्या महाव्यवस्थापकांनी दिला होता, मात्र, त्याला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.

चांद्यापासून बांद्यापर्यंत धावणाऱ्या एसटीची खरी नाळी कुणाजवळ असेल तर डेपो मॅनेजर पदावर कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याला आपल्या बसच्या फेरीची इत्यंन्भूत माहिती असते. त्यामूळेच प्रत्येक गावापर्यंत बस पोहचवण्याचे नियोजन करून, शेवटची बस सोडण्याचे काम सुद्धा डेपो मॅनेजर चोखपणे बजावते. त्यामूळे डेपो मॅनेजर अधिकारी नियमीत स्वरूपात असने फार गरजेचे असते.

मात्र, सध्या स्थितीत राज्यभरात खालच्या अधिकाऱ्यांना डेपो मॅनेजर पदावर पदोन्नती एसटी महामंडळाने देऊन राज्यातील रिक्त मॅनेजरची पद भरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र अधिकाऱ्यांकडून नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याची उदासीनता दिसून येत आहे.

परिणामी एसटी बसच्या फेऱ्यावर परिणाम होत असून, परंपरागत वेळेत सुटणाऱ्या फेऱ्या सुद्धा रद्द होत असल्याचे दिसून येत आहे. नादुरूस्त बसेस आणि डेपो पातळीवर संपुर्ण गणीत बिघडले आहे.

मुंबई विभागात कुर्ला नेहरू नगर आणि मुंबई सेंट्रल डेपोमध्ये अद्याप नियमीत डेपो मॅनेजर रूजू झाले नसल्याने, खालच्या अधिकाऱ्याला प्रभार देण्यात आला आहे. त्यामूळे पदोन्नती मिळूनही नियुक्तीच्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर एसटी महामंडळ प्रशासनाकडून ठोस कारवाई का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी द्या

जेवढ्या अधिकाऱ्यांना डेपो मॅनेजर म्हणून नियुक्ती दिली. त्या खालील प्रतिक्षा यादीत असलेले अधिकारी सुद्धा डेपो मॅनेजर पदावर बढती मिळेल या प्रतिक्षेत आहे. त्यामूळे नियुक्ती मिळालेले अधिकारी रुजू होत नसल्यास प्रतिक्षा यादीतील अधिकाऱ्यांना डेपो मॅनेजर पदावर नियुक्ती देण्याची मागणी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com