"ST कर्मचारी कामावर हजर न झाल्यास..."; अनिल परब यांचं मोठं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Parab

"ST कर्मचारी कामावर हजर न झाल्यास..."; परब यांचं मोठं वक्तव्य

राज्य परिवहन महामंडळाचं शासनात विलीनीकरण करा ही मागणी घेऊन राज्यातील एसटी कर्मचारी सध्या संपावर आहेत. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या संपाननंतर आता सरकारकडून कर्मचाऱ्यांविरुद्ध देखील कठोर कारवाई केली जात असल्याचं दिसतं आहे. संपावर असेलेल्या दोन हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काल हजर होण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यांनंतर आता अनिल परब यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

हेही वाचा: 'दुसरा गाल पुढे करण्यासाठी...' कंगनाला गांधीजींचे पणतू तुषार गांधींचे उत्तर

राज्यातील वेगवेळ्या आगारातील दोन हजारांवर कर्मचाऱ्यांना एसटीने काल अल्टीमेटम दिलं होतं. त्यापूर्वी काही कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आलं आहे. त्यानंतर आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठं विधान केलं असून एसटी कर्मचारी कामवर हजर न झाल्यास २०१६,२०१७ आणि २०१९च्या भरतीमधील प्रतिक्षा यादीतील लोकांना भरती करून घ्यावे लागेल असं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.

loading image
go to top