ST Workers Strike : ...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही; पडळकरांचा राज्य सरकारला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी संप चिघळणार, पडळकर आणि खोत यांचा आझाद मैदानावर मुक्काम

एसटीच्या विलिनिकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. तर सरकारने संप मागे घ्या तरच चर्चा करू असं सांगितल्यानं आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता आहे.

एसटी संप चिघळणार, पडळकर आणि खोत यांचा आझाद मैदानावर मुक्काम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

एसटीच्या विलिनिकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. तर सरकारने संप मागे घ्या तरच चर्चा करू असं सांगितल्यानं आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता आहे. गेल्या पाच दिवासंपासून हा संप सुरु आहे. बुधवारी कर्मचारी मंत्रालयावर धडकणार होते मात्र त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. आता सरकारकडून संप मागे न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तरीही कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे.

आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला असून आज संप करणारे कर्मचारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे आझाद मैदानावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह सदाभाऊ खोत हेसुद्धा सहभागी झाले आहेत. त्यांनी रात्रभर संप करणाऱ्या

हेही वाचा: मान मोडून काम केल्याने मानेचे दुखणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानावर मुक्काम केला. बुधवारी सदाभाऊ खोत यांना मानखुर्द येथे पोलिसांनी अडवल्यानंतर तिथेच ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानतंर सदाभाऊ खोत आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले होते.

आझाद मैदानावरील संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळक यांनी मुक्काम केला. याचे फोटो गोपीचंद पडळकर यांनी फोटो शेअर करत म्हटलं की, जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. काल रात्री एसटी कर्मचाऱ्यांसोबत जेवण करुन आझाद मैदानावरच मुक्काम केला.

loading image
go to top