

एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार अर्धाच देण्यात आला आहे. आता उर्वरित पगार मंगळवारी देण्यात येणार आहे. मात्र एसटी महामंडळाला राज्यसरकारकडून पुरेसा निधी दिला जात नसल्यानं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केलीय. नुकताच त्यांनी एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून पदभारही स्वीकारला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी एसटी महामंडळाला मिळणाऱ्या निधीबाबत प्रतिक्रिया दिली.