ST Workers Strike: 'आता सरकारचं तेरावं घालणार'; सदाभाऊंचा घणाघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Strike: 'सरकारचं तेरावं घालणार'; सदाभाऊंचा घणाघात
ST Workers Strike: 'आता सरकारचं तेरावं घालणार'; सदाभाऊंचा घणाघात

ST Strike: 'सरकारचं तेरावं घालणार'; सदाभाऊंचा घणाघात

एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला बारा दिवस होऊन गेले तरी अद्याप त्याच्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. त्या संपावरुन राजकीय वातावरण तापले आहे. अशावेळी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. आझाद मैदानामध्ये जे कर्मचारी आंदोलनाला बसले आहे त्यांच्यावतीनं रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. कर्मचाऱ्यांच्या बाजूनं न्याय न मिळाल्यास सरकारचं तेरावं घालण्यात येईल. असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

बैठक घेतल्याचा दिखावा करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना न्याय नाही. परिवहन मंत्र्यांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. कामगारांची अडवणूक, परिवहन मंत्री शकुनी मामाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे कामगारांच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. आता विलिनीकरण अशक्य आहे असे सांगण्यात आले आहे. तुमच्या समितीचा विलिनीकरणाचा अहवाल हा विरोधातच येणार आहे. हे लिहून ठेवा. आम्ही काय लहान मुले आहोत का? असा सवाल खोत यांनी उपस्थित केला. येत्या काळात आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत. एस टी कर्मचाऱ्यांची लेकरं बाळं उपाशी आहेत. याचा कुणीही विचार करायला तयार नाही.

समितीकडून कोणताही न्याय मिळणार नाही. कर्मचाऱ्यांची फसवणूक करु नका. जर दोन दिवसांत निर्णय घेतला गेला नाही तर कर्मचाऱ्यांच्या मुलांबाळांसकट परब साहेबांच्या बांद्रयातील घरावर मोर्चा नेणार आहोत. त्यावेळी आम्हाला कितीही पोलिसांनी अडवले तरी त्याची पर्वा करणार नाही. आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मात्र त्याच्यावर काही तो़डगा निघालेला नाही. मंत्री म्हणून आपली जबाबदारीचे भान ठेवायला हवे. बेभान होऊन चालत नाही. त्यामुळे येत्या दिवसांत कर्मचारी योग्य तो निर्णय घेतील. असेही खोत यांनी सांगितले.

loading image
go to top