स्टार्टअप इंडियात महाराष्ट्र "डाउन' 

तात्या लांडगे
रविवार, 17 जून 2018

सोलापूर : केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 22 हजार 890 नवउद्योजकांनी नोंदणी केली. त्यापैकी फक्‍त 3 हजार 203 नवउद्योजकांनाच लाभ मिळाला आहे. त्यावरून स्टार्टअप इंडियात महाराष्ट्र अद्यापही 'डाउन'च असल्याचे स्पष्ट होते. 

सोलापूर : केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 22 हजार 890 नवउद्योजकांनी नोंदणी केली. त्यापैकी फक्‍त 3 हजार 203 नवउद्योजकांनाच लाभ मिळाला आहे. त्यावरून स्टार्टअप इंडियात महाराष्ट्र अद्यापही 'डाउन'च असल्याचे स्पष्ट होते. 

महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमधील नवउद्योजकांना उद्योग स्थापन्यासाठी अर्थसाह्य व्हावे आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने स्टार्टअप इंडिया योजना सुरू करण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून अर्थसाह्य देण्याची व्यवस्था केंद्र सरकारने केली. परंतु, बहुतांशी बॅंकांकडून या योजनेंतर्गत कर्ज मिळत नाही. कर्ज मिळविण्याकरिता वारंवार बॅंकेचे दरवाजे झिजवावे लागत असल्याने ही योजना कागदावरच असल्याची चर्चा आहे. 

जिल्हानिहाय लाभार्थी (कसांत उद्दिष्ट) 
नगर 84 (772), अकोला 32 (298), अमरावती 59 (884), औरंगाबाद 118 (594), बीड 11 (296), भंडारा 20 (224), बुलडाणा 24 (374), चंद्रपूर 11 (33), धुळे 11 (244), नागपूर 303 (1248), नांदेड 27 (390), गडचिरोली 8 (130), गोंदिया 16 (192), हिंगोली 1 (134), जळगाव 55 (628), जालना 20 (228), कोल्हापूर 151 (780), लातूर 37 (344), मुंबई 855 (4232), नंदुरबार 154 (4), नाशिक 99 (1118), उस्मानाबाद 19 (228), पालघर 9 (478), परभणी 3 (218), पुणे 499 (2784), रायगड 70 (776), रत्नागिरी 83 (460), सांगली 57 (530), सातारा 38 (568), सिंधुदुर्ग 49 (296), सोलापूर 660 (79), ठाणे 281 (1858), वर्धा 24 (272), वाशिम 9 (152) आणि यवतमाळ 15 (346). 

स्टार्टअप... 
36 
जिल्हे 

10,000 कोटी 
योजनेतील तरतूद 

22,890 
नवउद्योजकांचे उद्दिष्ट 

3,203 
प्रत्यक्ष लाभार्थी 

542.15 कोटी 
मिळालेली रक्‍कम 

19,687 
लाभाच्या प्रतीक्षेत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: startup India down in Maharashtra