
Maharashtra Politics : NCPच्या नेत्याने काढलं काँग्रेसच्या बड्या नेत्याचं स्टँडर्ड म्हणाले...
राज्याच्या राजकारणात मोठी उलाढाल झाली. त्यानंतर राज्यातील राजकारणाच संपूर्ण चित्र पालटलं. राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षातील नेत्यानी पक्षांना रामराम ठोकला आणि शिंदे-फडणवीस यांच्या शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत खदखद दिसून येऊ लागली आहे.
गोंदियामध्ये महाविकास आघाडीचे नेते एकमेकांची फिरकी घेताना दिसून येत आहेत. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्टँडर्ड नाहीत, मी फक्त स्टँडर्ड लोकांवर बोलतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेलांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला आहे.
हेही वाचा: Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाबाबत शिवसेना खासदाचे मोठे विधान! म्हणाले...
प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भंडारा-गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांची भाजपसोबत मैत्री असल्याच्या गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला होता.
हेही वाचा: Dhananjay Munde : पंकजा मुंडेंपाठोपाठ उपमुख्यमंत्रीही धनंजय मुंडे यांच्या भेटीला
याबाबत माध्यमांनी प्रफुल्ल पटेलांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, प्रफुल्ल पटेल म्हणाले, नाना पटोले स्टँडर्ड नाहीत, मी स्टँडर्ड लोकांवर बोलतो, असे म्हणत त्यांनी नाना पटोले यांना सुनावले आहे. प्रफुल्ल पटेलांच्या या वक्तव्याने पुन्हा एक नवीन राजकीय वादाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आता नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील वाद पुन्हा चव्हाटयावर आला आहे.